India vs New Zealand, Mumbai Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरी आणि शेवटची टेस्ट 1 नोव्हेंबर (शुक्रवार) पासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु होणार आहे. टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचची सीरिज यापूर्वीच गमावली आहे. पण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील शर्यतीमधील आव्हान मजबूत ठेवण्यासाठी भारतीय टीमला मुंबईत जिंकणं आवश्यक आहे. दोन टेस्टमधील निराशाजनक कामगिरीनंतर टीम मॅनेजमेंटनं नवा डाव टाकलाय. त्यांनी IPL 2024 मधील विजेत्या टीममधील फास्ट बॉलरचा तातडीनं टीममध्ये समावेश केला आहे.
दिल्लीचा फास्ट बॉलर हर्षित राणाचा (Harshit Rana) चा मुंबई टेस्टसाठी टीम इंडियात समावेश करण्यात आलाय. कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) यावर्षीच्या आयपीएल सिझनचे विजेतेपद पटकावण्यात हर्षितच्या बॉलिंगचा महत्त्वाचा वाटा होता.तो सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॉल आणि बॅट दोन्ही माध्यमातून आश्वासक कामगिरी करतोय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या 18 सदस्यीय टीममध्येही हर्षितचा समावेश आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हर्षितनं वेग आणि अचूकतेच्या जोरावर राष्ट्रीय निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. बांगलादेशविरुद्ध झालेल्या T20 सीरिजसाठीही त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला होता. पण, त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. त्यानंतरही हर्षित सातत्यानं त्याची क्षमता सिद्ध करतोय.
दिल्ली विरुद्ध आसाम या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसऱ्या फेरीच्या सामन्यात हर्षितनं त्याची क्षमता सिद्ध केली. त्यानं त्या मॅचमध्ये एका इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर 59 रनची उपयुक्त खेळी केली. हर्षितच्या ऑल राऊंड कामगिरीच्या मदतीनं दिल्लीनं तो सामना 10 विकेट्सह जिंकला. त्याचबरोबर बोनस पॉईंट्सचीही कमाई केली.
( नक्की वाचा : IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धची सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाचा मुंबई टेस्टसाठी धाडसी निर्णय )
मुंबई टेस्टचं पिच सपोर्टिंग असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हर्षितच्या बॉलिंगसाठी हे पिच उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world