Exclusive : रक्षकच बनला भक्षक! उत्तर महाराष्ट्रातील IPS अधिकाऱ्यानं तरुणीवर केले भयंकर अत्याचार

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबादारी ही पोलिसांवर असते. पण, पोलिसांनीच गुन्हा केला तर सामान्यांनी कुणाकडं दाद मागायची असा प्रश्न एका धक्कादायक प्रकरणामुळे निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबादारी ही पोलिसांवर असते. पण, पोलिसांनीच गुन्हा केला तर सामान्यांनी कुणाकडं दाद मागायची असा प्रश्न एका धक्कादायक प्रकरणामुळे निर्माण झाला आहे. उत्तर महाराष्ट्र पोलीस दलात काम करत असलेल्या तरुण आयपीएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दर्शन दुगड असं या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते नंदुरबारमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा नागपूरच्या इमाम बाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

काही वर्षांपूर्वी IPS अधिकारी झालेले दर्शन हे मुळचे यवतमाळचे असल्याची माहिती आहे. आरोपी बेरोजगार असताना 2022 साली एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीशी त्याची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर त्यानं या मैत्रीचं रुपांतर प्रेमसंबंधात केले. 

( नक्की वाचा : Kalyan : बदलापूर प्रकरणाची कल्याणमध्ये पुनरावृत्ती ! आश्रमशाळेत मुलींवर अत्याचार, तर मुलांना.... )
 

याबाबतच्या कथित माहितीनुसार,आरोपीनं या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यामधून जवळीक निर्माण करत केरळमधील हॉटेलमध्ये आणि नागपूरच्या इमामबाडा परिसरातील हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नागपूरच्या इमामाबाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : दोन मुलांची आई पडली शेजारच्या तरुणीच्या प्रेमात, दोघी घरातून पळाल्या, शोधल्यानंतर पोलिसांना बसला धक्का )
 

आरोपीनं सलग दोन वर्ष शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. मात्र आयपीएस सेवेत निवड झाल्यावर त्यानं लग्नाला नकार दिला आणि जातीयवाचक िशवीगाळ करुन मारहाण केली. या प्रकरणामुळे पीडित तरुणी नैराश्यात गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर तरुणीच्या मावस बहिणेने देखील शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. आरोपी आयपीएस अधिकारीच असल्यानं पोलीस तपास अधिकारी याबाबत अधिक बोलणे टाळत आहे. 

Topics mentioned in this article