
अमजद खान, प्रतिनधी
बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना अद्याप ताजी आहे. त्याचवेळी ठाणे जिल्ह्यात आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.कल्याणजवळच्या खडवलीत अतिशय धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पसायदान नावाच्या खासगी आश्रम शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचर करण्यात आला तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून शाळेच्या पाहणी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये शाळेचा संचालक बबन शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, शाळेतील शिक्षिका दर्शना पंडीत आणि कामगार प्रकाश गुप्ता याचा समवेश आहे. प्रकाश गुप्ता हा मुलींवर लैगिंक अत्याचार करीत होता.
काय आहे प्रकरण?
खडवलीली पसायनदान या खाजगी आश्रम शालेत बेघर, निराधार आणि गोर-गरीब मुलांना शिक्षण दिले जाते. काही दिवसांपूर्वी खडवली येथील खासगी आश्रम शाळेत मुलांना बेदम मारहाण केली जात असल्याची तक्रार ठामे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल समितीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. समितीच्या अधिकारी वर्गाने थेट पसायदान या खाजगी आश्रमशाळेची पाहणी केली.
( नक्की वाचा : कोट्यवधी संपत्तीच्या मालकीणीचा नाल्यामध्ये मृतदेह, नोजपिनमुळे सापडला सूत्रधार! वाचा कसा लागला छडा )
या पाहणीच्या दरम्यान अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. जेव्हा शाळेतील मुलांना आणि मुलींना समितीच्या सदस्यांनी विचारपूस केली. मुलांची व्यथा एकून समितीच्या सदस्य व्यथित झाले. मुलांना दररोज मारहाण केली जात होती . दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केला जात होता. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी टिटवाळा पाेलिसांनी पसायदान या खाजगी आश्रमशाळेच्या संचालकांसह पाच जणांना अटक केली आहे.
या घटनेनंतर खडवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहे. अन्य विद्यार्थ्यांसोबतही प्रकारस घडला आहे का ? याचा पोलीस तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world