नकली RPF ला रेल्वे पोलिसांकडून अटक; चौकशीत समोर आलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला

Kalyan Crime news : एका व्यक्तीने आरपीएफमध्ये भरती करण्याच्या नावाखाली रोहनसह शेकडो लोकांकडून प्रत्येकी 6 लाख घेतले आहेत. त्यातील अनेकांना आरपीएफचा ड्रेस आणि नकली ओळखपत्र दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

नकली आरपीएफला कल्याण रेल्वे  पोलिसांनी अटक केली आहे. रोहन उतेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मात्र रोहन उतेकर या बोगस आरपीएफच्या अटकेनंतर जो खुलासा झाला तो अतिशय धक्कादायक आहे. एका व्यक्तीने आरपीएफमध्ये भरती करण्याच्या नावाखाली रोहनसह शेकडो लोकांकडून प्रत्येकी 6 लाख घेतले आहेत. त्यातील अनेकांना आरपीएफचा ड्रेस आणि नकली ओळखपत्र दिले आहेत. पोलीस त्या सुशील कदम नावाच्या भामट्या व्यक्तीच्या शोधात आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई-चेन्नई एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने येत असताना एस-1 बोगीत एका सीटवर एक आरपीएफ जवान रोहन उतेकर झोपला होता. टीसीने या आरपीएफ जवानाला औपचारिकता पूर्ण करण्याकरिता त्याचे आयकार्ड मागितले. आयकार्ड पाहिल्यानंतर टीसीच्या लक्षात आले की हा आरपीएफ जवान नाही आहे. टीसीने याची माहिती कल्याण आरपीएफ आणि कल्याण जीआरपीला दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. रोहन हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील माऊली वस्ती कानगावचा राहणारा आहे. रोहनच्या अटकेनंतर जो खुलासा झाला तो अतिशय धक्कादायक आहे.

(नक्की वाचा- एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला; कैचीच्या साहाय्याने मानेवर वार, आरोपी अटकेत)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन एका सुशील कदम नावाचा व्यक्तीला भेटण्याकरिता मुंबईला आला होता. या व्यक्तीने रोहनकडून 6 लाख रुपये घेतले आहेत. सुशील कदमने त्याला आरपीएफला कामाला लावण्याचं आश्वासन दिलं होतं. रोहनने केवळ त्याचेच नाही तर त्याच्या आठ नातेवाईकांचे पैसे देखील त्या व्यक्तीला दिले आहे. रोहनची  त्या व्यक्तीशी अहमदनगर येथील त्रिदल पोलीस या खाजगी पोलीस अकॅडमीचा  डायरेक्टरने करुन दिली होती. 

(नक्की वाचा - कुठे राहायला जायचे?; या क्षुल्लक कारणावरुन बायकोची हत्या)

या डायरेक्टरने देखील सहा लोकांचे पैसे त्या भामट्याला दिले होते. फक्त रोहन आणि प्रशिक्षण केंद्राचे डायरेक्टरच नाही तर जवळपास 100 पेक्षा जास्त जणांकडून या भामट्याने आरपीएफमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली पैसे उकळले आहेत. रोहन उतेकर याच्यासह काही तरुणांना हा भामटा कोलकाता येथे घेऊन गेला होता. त्याठिकाणी त्यांची मेडीकल करण्यात आली. बिहार राज्यातील पटणा येथे तीन महिने ठेवून त्यांची ट्रेनिंगही घेतली होती. जेव्हा हे तरुण त्या विचारायचे की, आमची आरपीएफमध्ये भरती केव्हा होणार? तेव्हा हा भामटा त्यांना कोणत्या तरी रेल्वे कार्यालयात घेऊन जायचा. आता कल्याण जीआरपी पोलिस आरोपी सुशील कदमच्या शोधात आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article