Ravikant Tupkar car accident : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कारला अपघात, ट्रकची धडक; अपघात की घातपात?

हा अपघात होता की घातपात अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आताची मोठी बातमी समोर आली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती आहे. 17 मे रोजी मध्यरात्री धाराशिव येथील वाशी नजिक भरधाव ट्रॅकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. लातूरकडून जालनाच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात कुणालाही काही दुखापत झालेली नाही. तुपकर यांच्यासह सुदैवाने वाहनातील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद ट्रक चालकाने त्यांच्या कारला मागून धडक दिली. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. याशिवाय हा अपघात होता की घातपात याचाही शोध घेतला जात आहे. तुपकर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान हा प्रकार घडला. 

Advertisement

नक्की वाचा - Beed Crime: संतोष देशमुख पार्ट- 2 करायचा..,बीडमध्ये तरुणाला लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण

    कसा घडला अपघात?
    रविकांत तुपकर यांना लोकवर्गणीतून दिलेली इनोव्हा कार पारगाव टोल नाक्यावर थांबलेली होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला मागून धडक दिली. कारच्या मागच्या बाजूला बसलेले लोक समोर फेकले गेले. त्यामुळे मागे बसलेल्या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. सदैवाने रविकांत तुपकर यांनी काहीही दुखापत झालेली नाही. ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचं समोर आलं आहे, दरम्यान या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. 

    Advertisement

    रविकांत तुपकर हे राज्यात कर्जमुक्तीच्या प्रश्नावर दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नाशिक, परभणी, बीड येथील दौरे पूर्ण केले असून आज अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे ‘कर्जमुक्ती एल्गार सभेला संबोधित केले. सभा आटोपून त्यांनी लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथे कार्यकर्त्यांसोबत स्नेहभोजन घेतले व त्यानंतर रात्री ११ वाजता जालन्याच्या ते दिशेने मार्गस्थ झाले असताना वाशी जवळ हा अपघात घडला. या अपघातामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. मात्र तुपकर हे पूर्णतः सुरक्षित असल्याचे समजताच सर्व कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला. या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित यंत्रणांकडून सखोल व सर्व बाजुनी चौकशी व्हावी अशी मागणी क्रांतिकारी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. 

    Advertisement