आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला मारण्यासाठी पीडित मुलीच्या वडिलांनी कुवेतहून भारत गाठला आणि आरोपी नातेवाईकाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी पुन्हा कुवेतला पसार झाला. हत्येनंतर मुलीच्या वडिलांनी एक व्हिडिओ मेसेज जारी केला, ज्यामध्ये पोलिसांनी कारवाई न केल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंजनेय प्रसाद असं पीडित मुलीच्या पित्याचं नाव आहे. अजंनेयने 6-7 डिसेंबरच्या रात्री आपले शारीरिकदृष्ट्या अपंग नातेवाईक अंजनेयुलू (59 वर्ष) यांची लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या केली.
(नक्की वाचा- दोन उत्तपे कमी देणे पडले महागात; हॉटेल मालकाला ग्राहक आयोगाचा दणका)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंजनेय आणि त्याची पत्नी चंद्रकला मागील अनेक वर्षांपासून कुवेतमध्ये नोकरीला आहेत. तर त्यांची 12 वर्षांची मुलगी आजी-आजोबांसोबत आंध्रप्रदेशात राहत होती. नंतर मुलगी चंद्रकलाची बहीण लक्ष्मी आणि तिच्या पतीसोबत राहायला गेली. राहत्या घरी लक्ष्मी झोपेत असताना अंजनेयुलू याने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने संपूर्ण घटना काकूंना सांगितली, मात्र तिला गप्प राहण्यास सांगितलं.
त्यानंतर एकेदिवीशी लक्ष्मीने फोन केला आणि त्यांच्या मुलीला घरी घेऊन जाण्याची विनंती केली. कुवेतला परतल्यानंतर तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितलं. यानंतर अंजनेयच्या पत्नीने स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली. अंजनेयाने दावा केला की आरोपींवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. छेडछाड करणाऱ्याला फक्त इशारा देऊन सोडण्यात आले.
(नक्की वाचा- - खेळता खेळता खाली कोसळली, जीवानिशी गेली, 15 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत काय झालं?)
त्यनंतर अंजनेय स्वत: बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंजनेय भारतात आला आणि 6 डिसेंबरच्या रात्री अंजनेयुलूची हत्या केली. हत्येनंतर त्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली देखील दिली. पोलिसांनी अंजनेयविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत .