योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Minor Girl Rape Case News : अकोला शहारात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याच्यार केल्याची घटना समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. ही संतापजनक घटना अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळं संपूर्ण अकोल शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,घटनेच्या दिवशी पीडित मुलीची आई गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती.घरातून बाहेर पडण्याआधी महिलेनं तिचा मुलगा आणि मुलीला सावत्र वडिलांकडे जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आरोपी शहाने (सावत्र वडील) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीला तीव्र वेदना झाल्या आणि तिला अस्वस्थ झाल्यासारखं वाटू लागलं. त्यानंतर पीडित मुलीने आई घरी आल्यावर तिला घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत सांगितलं.
नक्की वाचा >> NDTV Exclusive : सूर्याला कोणी बनवलं नंबर 1 कॅप्टन? मुलाखतीत सूर्यकुमारने सगळंच सांगितलं, "तो एकमेव खेळाडू.."
आईने पीडित मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि..
त्यानंतर महिलेनं तिच्या मुलीला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पीडित मुलीवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी दिली आहे.
नक्की वाचा >> Video : कुलदीपने PAK च्या फलंदाजांची नांगी ठेचली! संजू बनला 'स्पायडर मॅन', हवेत उडी मारून घेतला अप्रतिम झेल
अत्याचाराच्या या गंभीर घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून,नागरिक आणि समाजसेवी संस्थांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. बालकांवरील अत्याचारांच्या घटना वाढत असल्याने अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी आणि समाजात गुन्हेगारी कृत्यांवर अंकुष ठेवावास अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळं अकोला पुन्हा एकदा हादरले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असं मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.