Navi Mumbai Crime : App डाऊनलोड करायला सांगितलं अन् 2.30 कोटी उडाले; महिलेची मोठी फसवणूक

नवी मुंबई बेलापूर येथील एका 43 वर्षीय महिला व्यापाऱ्याची तब्बल 2 कोटी 29 लाख 48 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Crime : नवी मुंबई बेलापूर येथील एका 43 वर्षीय महिला व्यापाऱ्याची तब्बल 2 कोटी 29 लाख 48 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात 419, 420, 465, 468, 34 भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील 66(D) कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क, विश्वास संपादन करून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त

तक्रारदार अर्थना मेहता (वय 43) व्यवसायाने व्यापारी असून त्या बेलापूरमधील लखानी मॅनफोस्ट इमारतीत राहतात. एप्रिल 2025 पासून 17 जुलै 2025 या कालावधीत, "VIP 1 Equity Exchange" व "VIP 1 Elite Exchange" या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला. या ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सनी त्यांना "5% Upper Circuit Stock", "Block Deals", आणि "IPO Investment" अशा त्रिस्तरीय योजनांतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

त्यासाठी एका वेबसाईड लिंकवरुन आणि Google Play Store वरून impv pro हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तिला रक्कम पाठवायला लावली. त्यानंतर तक्रारदार यांना गुंतवणुकीसाठी Yes Bank, IDFC Bank, IndusInd Bank आणि Karur Vysya Bank मधील विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले गेले. हे खाते आरोपींनी बनावट कागदपत्रांद्वारे उघडल्याचीही शक्यता आहे.

Advertisement

नक्की वाचा - Nagpur Crime : मेव्हणीमुळे प्रेमाच्या नात्यात विषाचा खडा, पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल

तक्रारदाराने एकूण 2.29 कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर त्या अ‍ॅपमध्ये नफ्यासह रक्कम दाखवली गेली. मात्र रक्कम मागवूनही न मिळाल्यामुळे फसवणुकीचा संशय बळावला आणि अखेर 21 जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

कोण आहेत आरोपी?

या गुन्ह्यात व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918533896422, +919703276392, +919032596418 (Shailaja Paik), +918463986268 (Raghav) यांचा समावेश आहे. याशिवाय फसवणुकीसाठी वापरले गेलेले अ‍ॅप, वेबसाईट व बँक खाती यांचे तपशील खालीलप्रमाणे:

Advertisement

अ‍ॅप: impv pro

बँक खाती:

Yes Bank: 017961900002749

IDFC Bank: 10227273239

IndusInd Bank: 259121902426, 258658359380

Karur Vysya Bank: 1257135000011870

पोलिसांचा तपास सुरू; अद्याप आरोपी अटकेत नाहीत

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी आणि पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी सदर वेबसाइट, अ‍ॅप, बँक खाते, तसेच आरोपींच्या मोबाईल क्रमांकांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. हा गुन्हा ऑनलाईन स्वरूपाचा असल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी भेट न देता तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे.

नवी मुंबई पोलिसांन काडून नागरिकांना आव्हान

सावध राहा, जागरूक व्हा! सायबर पोलिसांनी नागरिकांना सतत सुचवले आहे की, अनधिकृत गुंतवणूक ग्रुप, अज्ञात लिंक, अ‍ॅप्स यांच्यापासून सावध राहा. कुठलीही मोठी परताव्याची हमी देणारी योजना फसवणुकीची शक्यता बाळगते

Advertisement
Topics mentioned in this article