गुरु दळवी, प्रतिनिधी
सिंधुदुर्गमधील रोणपाल -सोनुर्ली गावाच्या जंगलात एका विदेशी महिलेला लोखंडी साखळीनं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेला तब्बल 2 ते 3 दिवस घनदाट जंगलात बांधून ठेवल्याचा अंदाज आहे. सोनार्ली येथील एका गुराख्याच्या जागरुकतेमुळे हा सर्व प्रकार उघड झाला.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकार?
रोणपाल आणि सोनार्ली या दोन्ही गावातील मध्यभागी हे जंगल आहे. या जंगलात या महिलेला लोखंडी साखळीनं बांधण्यात आलं होतं. दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसतांना एवढ्या आतमध्ये तिला कसे आणि कोणी आणले हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात आतमध्ये जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला.
( नक्की वाचा : भिवंडीत 6 वर्षीय चिमुकल्याची हत्या; आरोपीला काही तासात अटक, हत्येचं कारणही समोर )
याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली. तिच्याकडे असलेल्या आधारकार्ड वरुन तिची ओळख पटली. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world