
बेंगळुरु: कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येची खळबळजनक बातमी बेंगळुरूमधून समोर आली आहे. ओमप्रकाश यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला असून प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीनेच निर्घृणपणे ओमप्रकाश यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी, कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश रविवारी बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी गूढ परिस्थितीत मृतावस्थेत आढळले. 68 वर्षीय निवृत्त डीजीपी यांच्या पोटावर आणि छातीवर चाकूने अनेक जखमा आढळल्या होत्या, त्यामुळे ही हत्या कोणी केली? याबाबतचा तपास सुरु होता.
यामध्ये आता मोठा खुलासा झाला असून ओमप्रकाश यांची पत्नी पल्लवीनेच ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादावरून त्यांच्या पत्नीने ओमप्रकाश भांडण केले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला ज्यानंतर पत्नी पल्लवीने त्यांच्यावर मिरची पावडर फेकली. मिरची पावडर फेकल्याने बेसावध असलेल्या ओमप्रकाश यांना दोरीने बांधले आणि नंतर चाकूने वार करुन हत्या केली. हत्येसाठी काचेच्या बाटलीचाही वापर केला.
सूत्रांनी सांगितले की, हत्येनंतर, निवृत्त अधिकाऱ्याच्या पत्नीने दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीशी बोलून तिला मी राक्षसाला मारले असेही सांगितले.. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ओम प्रकाशची पत्नी आणि त्याच्या मुलीला ताब्यात घेतले. आई आणि मुलीची आता सुमारे 12 तास चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पोलिस प्रमुखांच्या धक्कादायक हत्येतील पत्नी ही प्रमुख संशयित आहे.
दरम्यान, ओम प्रकाश आणि त्यांच्या पत्नीचा एका नातेवाईकाशी दुसऱ्याला हस्तांतरित केलेल्या मालमत्तेवरून वाद झाला होता. माजी अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याचा संशय आहे. या हत्येत त्याच्या मुलीचा सहभाग होता की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. ओम प्रकाश यांच्या मुलाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world