Fraud news: अमेरिकेला जाण्यासाठी 85 लाखांचा सौदा, पासपोर्टसह व्हिसाची ही केली सोय , पण एक चुक भोवली अन्...

पण एअरलाईन कर्मचाऱ्यांच्या (Airline Staff) सतर्कतेमुळे बोर्डिंग गेटवरच त्यांचा डाव उधळला गेला.

जाहिरात
Read Time: 2 mins

परदेशात जावून चांगले पैसे कमवण्याची अनेक जण स्वप्न पाहात असतात. पण परदेशात जाणे ऐवढे सोपे राहीले नाही. त्यासाठी अनेक जण अवैध मार्गाचा अवलंब करतात. कोणी डंकीने परदेशात जातात. कुणी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतात. याचाच गैरफायदा एजंट घेत असतात. त्यातून लाखो- कोटी रुपयांचा गंडा घातला जातो. परदेशात जाणे दुरच उलट चौकशीच्या फेऱ्यात असे तरुण आणि तरुणीं अडकतात. असाच एक धक्कादायक प्रकार दिल्लीच्या विमानतळावर झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर (Airport) इमिग्रेशन टीमच्या सतर्कतेमुळे एक मोठा फसवणूक प्रकरण उघडकीस आले आहे. येथे दोन महिला प्रवाशांना बनावट पासपोर्टद्वारे कॅनडाला (Canada) पाठवण्याचा प्रयत्न केला जात होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुजरातमधील एजंट संदीप पटेल उर्फ ​​पिंटू पटेल याला अटक केली आहे. या एजंटने आपण काय करत होतो हे पोलिसांना तपासात सांगितले आहे. त्याच्या जबाबामुळे पोलिस ही हैराण झाले आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - श्रावण महिन्यात तुमच्या राशी नुसार करा 12 ज्योतिर्लिंग दर्शन, नक्कीच बदलेल तुमचं नशिब

10-11 जूनच्या रात्री किरणजीत कौर आणि नवनीत कौर यांच्या नावाने पासपोर्ट घेऊन दोन महिला दिल्ली विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्यांना काही तरी गडबड असल्याचे आढळले. त्यांनी त्यांचे पासपोर्ट व्यवस्थित तपासले. त्यानंतर त्यांना दोन्ही पासपोर्टवरील फोटो बदलले आहेत असे जाणवले. शिवाय व्हिसा (Visa) देखील बनावट दिसला. त्यानंतर दोन्ही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Delhi Murder : तौफिकनं नेहाला गच्चीवरुन का फेकलं? बुरखा घालून का लपला ? प्रत्येक गोष्टीचा झाला खुलासा

Advertisement

चौकशीत महिलांची खरी ओळख समोर आली. एका महिलेची ओळख गुजरातमधील मेहसाणा येथील निधिबेन पटेल अशी झाली. तर दुसरी अहमदाबाद येथील कृपा दर्जी होती. दोघांनी कबूल केले की त्यांना अमेरिकेला जायचे होते. त्यासाठी  त्यांनी एजंट पिंटू पटेल याला तब्बल 85 लाख रुपये दिले होते. अवैध मार्गाने आपण अमेरिकेत घुसणार होतो असंही त्यांनी सांगितलं. सुरूवातीला त्यांना अहमदाबादहून पुण्याला पाठवण्यात आले. जिथे त्यांना एका हॉटेलमध्ये (Hotel) थांबवण्यात आले. तिथेच त्यांना बनावट पासपोर्ट देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्याहून दिल्लीला आणण्यात आलं. तिथून त्या कॅनडाला जाणार होत्या.

ट्रेंडिंग बातमी - Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

पण एअरलाईन कर्मचाऱ्यांच्या (Airline Staff) सतर्कतेमुळे बोर्डिंग गेटवरच  त्यांचा डाव उधळला गेला. चौकशीत एजंटने कबूल केले की तो गेल्या 2-3 वर्षांपासून बनावट कागदपत्रे बनवून लोकांना परदेशात पाठवण्याचा धंदा करत आहे. आता पोलीस या रॅकेटशी संबंधित इतर एजंट्स, बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी आणि पैशांच्या व्यवहाराची चौकशी करत आहेत. बँक खात्यांची तपासणी आणि इतर संभाव्य प्रकरणांमध्येही त्याची भूमिका तपासली जात आहे.