Beed News : "मी एकटा पडलो..", मित्रांनी बर्थडे पार्टीला बोलावलं नाही, तरुणाने स्टेटस ठेऊन भयंकर पाऊल उचललं

मित्रांसोबत झालेल्या वादानंतर वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नाही,यामुळे एकटेपणा पडलेल्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून जीवन संपवलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed Crime News In Marathi

आकाश सावंत, प्रतिनिधी 

Beed Crime News Today : मित्रांसोबत झालेल्या वादानंतर वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं नाही,यामुळे एकटेपणा पडलेल्या एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली आहे. महेश उद्भव असं आयुष्य संपवलेल्या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,महेशने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले.घराच्या छतावर तो एकटाच झोपायला गेला होता. त्याने पाणी पिण्याच्या तांब्यात काहीतरी विषारी द्रव्य मिसळून प्यायले.बराच वेळ झाला तरी महेश खाली का आला नाही,हे पाहण्यासाठी कुटुंबीय रात्री 8 वाजेच्या सुमारास छतावर गेले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुरंदर विमानतळ की 'लँड जिहाद'चे केंद्र? जमिनींच्या खरेदी प्रकरावरून पुण्यातील सकल हिंदू समाज आक्रमक

मोबाईल स्टेटस ठेऊन तरुणाने जीवन संपवलं

महेशचे त्याच्या मित्रांसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. सोमवारी ६ एप्रिलला एका मित्राचा वाढदिवस होता.नेहमी मित्रांच्या कामात आणि वाढदिवसाच्या नियोजनात पुढाकार घेणाऱ्या महेशला यावेळी मित्रांनी बोलावले नाही.त्याला सोडून सर्वांनी वाढदिवस साजरा केला. यामुळे तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. आत्महत्येपूर्वी मंगळवारी दुपारी त्याने आपल्या मोबाईलवर "माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो"असे भावनिक स्टेटस ठेवले होते.

या स्टेटसवरून त्याला आलेला एकटेपणा आणि नैराश्य दिसून येत आहे.ऐन उमेदीच्या वयात महेशने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने कुंबेफळ गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.दरम्यान महेश च्या हट्टासाठी वडिलांनी शेती विकून त्याला अंबाजोगाई शहरात कपड्याचे दुकान टाकून दिले होते.