Gadchiroli News : लेकीशी फोनवर बोलताना सख्ख्या लेकाने भयंकर केलं; रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला बाप

विशेषतः आरोपीच्या पत्नीशी वडिलांचे वर्तन यावरून मतभेद वाढले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

मनीष रक्षमवार, प्रतिनिधी

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरमोरी तालुक्यातील पालोरा मार्गावर ही घटना घडली. देवाजी आडकू धकाते (वय ६५) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आरोपी मुलगा योगेश धकाते (वय २५) याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवाजी धकाते यांचा वीटभट्टीचा व्यवसाय होता. घरगुती कारणांवरून पिता-पुत्रांमध्ये सतत वाद होत होते. विशेषतः आरोपीच्या पत्नीशी वडिलांचे वर्तन यावरून मतभेद वाढले होते.

शत्रूपेक्षाही क्रूरपणे बापाची हत्या...

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश निर्जन ठिकाण दबा धरून वडिलांची वाट पाहत बसला होता. त्याच वेळी देवाजी आपल्या मुलीशी फोनवर बोलत त्या रस्त्यावरुन येत होते. त्याचवेळी त्यांच्यावर आरोपी योगेशने कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात देवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. योगेशने देवाजी याच्यांवर हल्ला केला तेव्हा देवाजी यांचा फोन सुरू होता. हल्ल्यावेळी वडिलांच्या किंकाळ्या फोनवरून मुलीने ऐकल्या. यानंतर फोन अचानक बंद झाला. घाबरलेल्या मुलीने तत्काळ नातेवाईकांना याची माहिती दिली.

Advertisement

नक्की वाचा - Pune News :प्राध्यापकाने स्टँम्प पेपरवर लिहिलं मात्र केलं भयंकर; पुण्यात Phd च्या विद्यार्थिनीचा दुर्देवी शेवट

बापाची हत्या केल्यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच शोध मोहिमेत सहभागी झाल्याचा आव आणला. मात्र, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. कडक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. समाजात अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Topics mentioned in this article