प्रत्येक नवरात्रीला मौनव्रत... अनेक उपास-तापास; 'ब्रम्हचारी गँगस्टर' लॉरेन्स बिश्नोई आपली गँग कशी चालवतो? 

ब्रम्हचर्य नियम पाळणारा, गुन्हेगारी जगतचा गुरू लॉरेन्स बिश्नोई  दर नवरात्रीला उपवासासोबत मौन व्रतही करतो त्याचबरोबर मांस, मटण, दारूला कधी हातही लावत नाही, असं म्हटलं जातं.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

सध्या बहुचर्चेत असलेला, देशाचा नवा डॉन लॉरेन्स बिश्नोई हा गुन्हेगारी विश्वात 'गुरूजी' म्हणूनही ओळखला जातो, 'जय बलकारी' असा त्याचा नारा आहे.  आश्चर्याची बाब म्हणजे एकीकडे लॉरेन्स हा एक गुन्हेगार तर आहेच, तर दुसरीकडे तो धार्मिकही आहे. ब्रम्हचर्य नियम पाळणारा हा अपराधी  जगातील सर्वात महागड्या ब्रँडचे कपडे घालतो व एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे तो त्याची गँग चालवतो. त्याची वार्षिक उलाढाल जवळपास कोटींच्या जवळपास आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईने सलमानखानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना सांगितले होते की, 'हा गुरूजींचा आदेश आहे'  त्यामुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरू म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. या संभाषणाचे रेकॉर्डिंगही मुंबई पोलिसांकडे आहे. 

लॉरेन्स बिश्नोई बद्दल काही गोष्टी अशा आहेत ज्या अक्षरशः आपल्या कल्पनेच्याही पलिकडील आहे. एकीकडे हा गुन्हे करतो तर एकीकडे  तो धार्मिक असल्याची  आणखी एक बाजू दिसते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपवासासोबतच त्याचे प्रत्येक नवरात्रीला मौनव्रतही असते. तो कधीही मांस किंवा दारूला स्पर्शही करत नाही. त्याचबरोबर जय बलकारी हा त्याचा नारा आहे.

नक्की वाचा - सद्गुरुंच्या ईशा फाऊंडेशनला दिलासा, 'दोन्ही मुली सज्ञान, म्हणून...'; सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?

विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. त्याआधी लॉरेन्सने नवरात्रीत 9 दिवस मौनव्रत पाळले होते. तो हुबेहूब 'सिक्रेट गेम्स' या गुन्हेगारी मालिकेतील पंकज त्रिपाठीने साकारलेल्या व्यक्तिरेखेसारखा आहे जो कमी बोलतो पण गुन्हा घडवून आणतो. इतकच नव्हे लॉरेन्सच्या वकील रजनी खत्रीही सांगतात की, तो धार्मिक आहे आणि प्रत्येक नवरात्रीला त्याचा  उपवास असतो. बऱ्याचजणांना एक दिवसही मौन व्रत करणं अवघड जातं पण तो 9 दिवस मौन व्रत करतो. त्याचा बालपणीचा एक फोटो आहे, ज्यामध्ये तो राजस्थानमधील एका मंदिराबाहेर उभा आहे. आणि सलमान खानने त्याच मंदिरात येऊन माफी मागावी, अशीही त्याची मागणी आहे. त्याचबरोबर तो ब्रह्मचर्य नियमांचेही पालन करतो. इतकच नव्हे तर, त्याच्या गँगमधील गुंडांनाही ना प्रेयसी आहे ना पत्नी. या व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबात एकच धाकटा भाऊच आहे, अनमोल बिश्नोई, जो मोठ्या भावाच्या मार्गावर चालत गुन्हेगारीच करत आहे आणि आपल्या मोठ्या भावाची गुन्हेगारी कंपनी तो परदेशातून चालवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्सचा दरवर्षीचा कोटींचा टर्नओवर आहे. 

लॉरेंस बिश्नोईची वसूली रेट लिस्ट

  • लॉरेन्स आता लोकांकडून 50 लाख ते 10 कोटी रुपयांची खंडणी मागत आहे.
  • बुकी आणि लक्झरी कार शोरूमच्या मालकांकडून 5 कोटी रुपयांपर्यंत खंडणीची मागणी.
  • तो म्युझिक इंडस्ट्रीतील लोकांकडून 5 कोटी ते 10 कोटी रुपये वसूल करतो.
  • बिल्डरांकडून 2 ते 5 कोटी रुपयांची मागणी. 
  • ज्वेलर्सकडून एक ते दोन कोटी रुपये वसूल करतो.
  • प्रॉपर्टी डीलर्सकडून 2 ते 3 कोटी रुपये घेतो. 
  • रेस्टॉरंट आणि मिठाई दुकान मालकांकडून 50 लाख 1 कोटी रुपयांची मागणी.
  • सट्टेबाजांकडून 2 ते 5 कोटी रुपये गोळा करतो.
  • बेकायदेशीर कॉल सेंटर चालवणाऱ्यांकडून 2 ते 5 कोटी रुपये घेतो.
  • दारू व्यावसायिकांकडून 1 ते 3 कोटी रुपयांची मागणी.
  • हवाला व्यापाऱ्यांकडून 5 ते 10 कोटींची वस
  • नक्की वाचा -  तीन मित्रांना पत्नीच्या बेडरूममध्ये पाठवलं अन्..., पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबातील लज्जास्पद घटना

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) चार्जशीटनुसार, लॉरेन्सच्या टोळीत सुमारे 700 शूटर्स आणि प्रचंड पैसा आहे. रजनी खत्री यांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्सकडे प्रचंड  मालमत्ता आणि जमीन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स त्याची गँग एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालवतो, ज्यामध्ये प्रत्येकाचं काम वेग वागळ आहे. या लोकांमध्ये शूटर्स, स्थानिक गुंड, लॉजिस्टिक सपोर्ट लोक आणि  लीगल टीमचाही यांचा समावेश आहे. लॉरेन्सच्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो जगातील सर्वात महागड्या ब्रँडचे बूट आणि कपडे घालतो. एनआयएच्या आरोपपत्रानुसार लॉरेन्स सातत्याने त्याच्या गँगचा विस्तार करत आहे. तो दाऊदप्रमाणे आपले साम्राज्य वाढवत आहे.