जाहिरात

Sadguru : सद्गुरुंच्या ईशा फाऊंडेशनला दिलासा, 'दोन्ही मुली सज्ञान, म्हणून...'; सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?

सद्गुरू जग्गा वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला (Isha Foundation) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Sadguru : सद्गुरुंच्या ईशा फाऊंडेशनला दिलासा, 'दोन्ही मुली सज्ञान, म्हणून...'; सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?
नवी दिल्ली:

सद्गुरू जग्गा वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनला (Isha Foundation) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाऊंडेशनविरोधात उच्च न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा परिणाम केवळ याच प्रकरणासाठी सीमित राहील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयाने सांगितलं की, मद्रास उच्च न्यायालयासाठी अशा प्रकरच्या याचिकेवर तपासाचे आदेश देणे योग्य नव्हते. वडिलांनी केलेली याचिका चुकीची आहे. दोन्ही मुली सज्ञान आहेत आणि त्या आपल्या मर्जीने आश्रमात राहत आहेत. 

काय आहे प्रकरण? 
निवृत्त प्रोफेसर एस कामराज यांनी ईशा फाऊंडेशनविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लता आणि गीता या त्यांच्या मुलींना आश्रमात ओलीस ठेवण्यात आल्याचा आरोपी कामराज यांनी केला होता.त्यांच्या याच याचिकेवर उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व गुन्हेगारीसंबंधित (Sadguru) प्रकरणाची माहिती मागितली होती. 1 ऑक्टोबर रोजी 100 हून अधिक पोलीस कर्मचारी फाऊंडेशनच्या मुख्यालयात पोहोचले होते. त्यावेळी सद्गुरूंनी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. 

Supreme Court : बांग्लादेशातून आसाममधील स्थलांतरितांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नक्की वाचा - Supreme Court : बांग्लादेशातून आसाममधील स्थलांतरितांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ईशा फाऊंडेशनमध्ये हेबियस कॉर्पससंबंधित प्रकरणं...
पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, ईशा फाऊंडेशनमध्ये गेल्या काही वर्षात बेपत्ता आणि आत्महत्येसंबंधित तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी पुढे सांगितलं की, हेबियस कॉर्पस प्रकरणात कथित बंदी आपल्या मर्जीने योगा केंद्रात राहत होत्या. प्रतिज्ञापत्रात दिल्यानुसार, गेल्या 15 वर्षात ईशा फाऊंडेशनच्या अधिकार क्षेत्रात अलंदुरई पोलीस ठाण्यात बेपत्ताची सहा प्रकरणं दाखल आहेत. यातील सहाव्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बेपत्ता झालेली व्यक्ती अद्याप सापडलेली नाही. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Supreme Court : बांग्लादेशातून आसाममधील स्थलांतरितांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Sadguru : सद्गुरुंच्या ईशा फाऊंडेशनला दिलासा, 'दोन्ही मुली सज्ञान, म्हणून...'; सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं?
Arjun Tendulkar koyla hi hai says ex cricketer and actor yograj singh
Next Article
तो कोळसा आहे! अर्जुन तेंडुलकरवर माजी क्रिकेटपटू आणि अभिनेत्याची सडकून टीका