क्षुल्लक कारणाने वाद, कुख्यात गुंड राजू शिवशरणची पुण्यात हत्या

राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
पुणे:

पुण्यातून (Pune Crime News) एक मोठा बातमी समोर आली आहे. कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला. पुण्यातील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री   टोळक्यांनी राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून केला. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड होता. त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडीतील राजू शिवशरण्याचा पाठलाग करून त्याची हत्या करण्यात आल्याचं समजते. 

Advertisement

नक्की वाचा - गर्लफ्रेंडला आयफोन गिफ्ट देण्यासाठी नववीतील मुलाने आईला दिला धोका; घरी गेला, कपाट उघडलं अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडी भागातील वंदे मातरम चौकात संशयित आरोपी महेश शिंदेने राजू शिवशरण याच्याकडे दारूसाठी पैसे मागितली होते. मात्र राजूने पैसे देण्यास नकार दिला. या रागातून महेश शिंदेने राजूच्या डोक्यात बाटलीने वार केला. या हल्ल्यामुळे शिवशरण जागीच कोसळला. यानंतर टोळक्यांपैकी महेश शिंदेने वीट, दगडाने त्याच्या डोक्यावर वार करून हत्या केली. या हल्ल्यादरम्यान निखिल चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. यात शिंदे जखमी झाले आहेत.