गेट-वे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण, धक्कादायक माहिती समोर

नौदलाच्या स्पीड बोटीला नवं इंजिन लावलं होतं. त्याची चाचणी त्याच समुद्रात सुरू होती.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला दुपारी तीनच्या सुमारास धडक बसली आणि या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. काही दिवसांपूर्वी कुर्ला बेस्ट बस अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. ते प्रकरण ताजं असताना आता मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर

कसा झाला अपघात?
नौदलाच्या स्पीड बोटीला नवं इंजिन लावलं होतं. त्याची चाचणी सुरू होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटल्याने ही बोट प्रवासी बोटीला धडकल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघातात 10 प्रवाशांचा आणि तीन नौदलाच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातातील 101 जणांचा वाचवण्यात यश आलं आहे. 

Advertisement