
Pune Crime : पुण्यात रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा याच्या गळाचा फास अधिक आवळण्याची शक्यता आहे. गौरवने पुण्यातील भररस्त्यात अत्यंत किळसवाणा प्रकार केला होता. दरम्यान गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचं सांगितलं जात आहे. गौरव आहुजाने मित्र भाग्येश ओसवालसह अमली पदार्थाचं सेवन करून हा गुन्हा केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत असल्याचे पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितलं. गुन्हा करण्यापूर्वी गौरव आणि भाग्येश यांनी कुठे अमली पदार्थांचं सेवन अथवा मद्यप्राशन केले, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.बारी यांनी दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील रस्त्यात लघुशंका करण्याचं प्रकरण गौरव सह त्याच्या मित्रांना अमली पदार्थ सेवन केला असल्याचा पोलिसांना संशय न्यायालयामध्ये पोलिसांनी ही बाब स्पष्ट केली आज गौरव आणि त्याच्या मित्राची पोलीस कोठडी संपत आहे त्यानंतर आज पुन्हा सुनावणी होईल.
नक्की वाचा - Pune Viral News : मस्ती उतरली; भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला अटक
पुण्यातील एका चौकात आलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव मनोज आहुजा (25, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता) आणि भाग्येश प्रकाश ओसवाल (22, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केट यार्ड) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजता येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात घडली. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यावर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत भाग्येश ओसवालला अटक केली, तर गौरव आहुजा कराड येथे पोलिसांना शरण आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world