सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune News: चारित्र्यावर संशय आणि हुंड्यासाठी होणाऱ्या अमानुष छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित इंजिनिअर विवाहितेनं टोकाचे पाऊल उचलल्याची घटना पुण्यातील उरळी कांचन परिसरातील सोरतापवाडी येथे घडलीय. दीप्ती मगर-चौधरी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने स्वतःच्या 3 वर्षीय चिमुकलीसमोरच गळफास घेऊन आयुष्य संपवलंय. यामुळे मुलीवर मोठा आघात झालाय. या प्रकरणी पती आणि सासूला अटक करण्यात आलीय तर सासरा-दीर फरार आहेत. दरम्यान आरोपी सापडत नाही तोवर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाहीत, अशी भूमिका दीप्तीच्या कुटुंबीयांनी घेतलीय. पोलिसांच्या विशेष पथकाकडून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय.
कोणकोणाला करण्यात अटक आली?
रोहन चौधरी - पती
सुनीता चौधरी - सासू (सरपंच)
दीर रोहित चौधरी आणि सासरा कारभारी चौधरी (शिक्षक) फरार आहे.
(नक्की वाचा: Pune News: पुण्यातील शिंदेवाडीतील लोक प्रचंड दहशतीत, मुळीच एकटे फिरू नका कारण ही आहे भीती)
लग्नामध्ये दिलं होतं 50 तोळे सोनं, लग्नानंतरही दिले लाखो रुपये
दीप्ती यांचा विवाह वर्ष 2019मध्ये रोहन चौधरीसोबत झाला होता. लग्नसोहळ्यामध्ये दीप्ती यांच्या कुटुंबीयांनी 50 तोळं सोनं दिलं होतं. पण एवढे सोनं देऊनही सासरच्या मंडळींचे समाधान झालं नाही. त्यांच्याकडून सातत्यानं कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीसाठी मागण्या सुरूच होत्या. शिवाय छळही सुरू होता. मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी मगर कुटुंबीयांनी दीप्तीच्या सासरच्या मंडळींना 10 लाख रुपये रोखरक्कम, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपयेही दिले होते. पण तरीही त्रास संपला नाही. तू दिसायला सुंदर नाही आणि घरचं काम येत नाही; असे म्हणून सतत तिला हिणवले जायचे. तिच्या चारित्र्यावरही वारंवार संशय घेऊन मानसिक खच्चीकरण केले जायचे. अखेर दीप्तीने 25 जानेवारी रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.
(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरलं! घरातच रक्तपात, आईनंच 11 वर्षीय मुलाचा गळा चिरला, मुलीवरही प्राणघातक हल्ला; कारण...)
सासू-पतीला अटके
घटनेची माहिती मिळताच उरळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पती आणि सरपंच सासूला तत्काळ अटकही करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world