ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Dharashiv Crime News : धाराशिवमध्ये एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटनशिप करणाऱ्या राजस्थान येथील डॉक्टराच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
गाडीला कट का मारला म्हणत आरोपीने पीडित डॉक्टराच्या गळ्याला कोयता लावला. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशु सत्यनारायण व्यास असं जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटनशिप करणाऱ्या डॉक्टरांना शासकीय रुग्णालयात सततचा त्रास होत असल्याने अशा आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे.