Hingoli Crime: हिंगोलीत राडा! 2 गट भिडले, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड; मध्यरात्री काय घडलं?

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे रात्री दोन गटातील युवकांच्या किरकोळ वादातून तुफान दगडफेक झाली आहे,

जाहिरात
Read Time: 1 min

लातूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मारहाण, अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. एकीकडे बीडमध्ये मारहाणीचे नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. दुसरीकडे सोलापूर आणि धाराशिवमध्ये झालेल्या क्रुर हत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. अशातच आता लातूरमध्ये दोन गटात राडा झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे रात्री दोन गटातील युवकांच्या किरकोळ वादातून तुफान दगडफेक झाली आहे, त्यानंतर दोन्ही गटातील जमा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला आणि यामध्ये काही गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली, दोन्ही गटातील जमाव हिंसक होत असल्याने पोलिसांकडून  लाठीचार्ज देखील करण्यात आला तसेच जमावाला शांत करण्यासाठी पोलीस अधीक्षक देखील रस्त्यावर उतरले होते.

(नक्की वाचा: Happy Holi 2025 Wishes: पिचकारीने प्रेमाच्या रंगांचा करा वर्षाव, प्रियजनांना पाठवा होळीच्या खास शुभेच्छा)

दरम्यान या घटनेमध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाले असून दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.. दरम्यान दोन्ही गटातील वाद मिटवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.