- हिंगोली जिल्ह्यातील एका तरुणीने प्रेमात पडून घर सोडले. तिच्या प्रियकराने तिला लग्नाचे आमिष दिले होते
- प्रियकराने तरुणीशी वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करून तिचे लैंगिक शोषण केले असल्याचा आरोप आहे
- प्रियकराने तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यास मारहाण करण्याची धमकी दिली
समाधान कांबळे
तरुणींनो प्रेमात पडताय तर सावधान. ही बातमी सर्वांनाच हादरवणारी आहे. हिंगोलीत घडलेल्या या घटनेनं सर्वच जण हादरले आहे. प्रेमापोटी प्रियकरासोबत घर सोडून गेलेल्या तरुणीच्या पदरात भयंकर गोष्ट पडली. एका तरुणीने प्रियकरावर विश्वास ठेवून घर सोडलं. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवलं होतं. त्यातून त्या तरुणी सोबत त्याने वारंवार शरीर संबंध ही प्रस्थापित केले. लग्न करायचे सोडा पण त्यानंतर त्याने तिच्या समोर जी अट ठेवली त्याने तर तिच्या पायाखालची वाळू सरकली. त्याची ती अट पाहून करायचे काय? असा प्रश्न त्या तरुणी पुढे होते. पण तिने डेअरिंग केली अन् पुढचा अनर्थ टळला. शिवाय ही धक्कादायक गोष्टी ही समोर आली.
काही महिन्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील एका गावातील तरुणीचं एका मुलावर प्रेम जडलं होतं. या दोघांनी मिळून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय तिला कोणत्या वळणावर आणून सोडेल हे कदाचित तिला माहित नव्हतं. पुळून गेल्यानंतर ते दोघे आधी अकोला नंतर पुणे यासारख्या शहरांमध्ये राहीले. पुढे हे प्रेमी युगल हिंगोली शहरामध्ये आले. तिथे त्यांनी एक भाड्याचं घर घेवून तिथं राहायला लागले. सुरूवातीचा एक महिना या प्रियकराने या तरुण सोबत चांगला व्यवहार केला. याच वेळी त्याने तिच्यासोबत वारंवार शरिरसंबंध प्रस्थिपित केले. तिचे लैंगिक शोषण केले. यावेळी तो तिला लग्नाचे आमिष दाखवत होता.
मात्र एक महिना उलटल्यानंतर या तरुणीला त्याने एक भयंकर अट टाकली. तो तिला वेश्याव्यवसाय करायला सांगत होता. तसं कर नाही तर तुला मारेन अशी धमकी देत होता. त्यातून तिला प्रियकराकडून बळजबरी आणि मारहाण करण्यात आली. असा आरोप या तरुणीने केला आहे. एवढेच नव्हे तर या पीडित तरुणीच्या प्रियकराच्या वडिलांनी देखील तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. दरम्यान दिवसेंदिवस प्रियकराकडून अत्याचार वाढत असल्याने या तरुणीने त्या घरातून पळ काढला. त्यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठले.
यासंदर्भात पोलिसांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पीडीतेच्या तक्रारीवरून आरोपी प्रियकर आणि अन्य दोघांविरुद्ध विविध कलमा द्वारे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी सद्यस्थितीला फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र हिंगोली सारख्या जिल्ह्यामध्ये अशी घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्याचा धक्कादायक आरोप पीडित तरुणीने केला आहे.