हिंगोली:
हिंगोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास मुकाडे या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस शिपायाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिसाची सासू, लहान मुलगा आणि साडू जखमी झाले असून सर्वांवर जिल्हा ग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. वसमत शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विलास मुकाडे या पोलीस कर्मचाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला होता. मात्र त्याने हे पाऊल का उचललं याची माहिती मिळू शकलेली नाही.
दरम्यान पोलीस शिपाई फरार झाला आहे.
बातमी अपडेट होत आहे.