जाहिरात

Honeytrap News: मॅडमचं एक स्माईल 90 लाखांना पडलं! हनीट्रॅपचं आतापर्यंतच सर्वात हादरवून टाकणारं प्रकरण

एका सुंदर चेहऱ्याच्या आणि हसऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या आडून दिशा बाबला नावाच्या तरुणीने या बड्या व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढळे होते.

Honeytrap News: मॅडमचं एक स्माईल 90 लाखांना पडलं! हनीट्रॅपचं आतापर्यंतच सर्वात हादरवून टाकणारं प्रकरण
  • जयपूरमधील एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून तब्बल 90 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्यात आली
  • आरोपी दिशा बाबला नावाच्या महिलेनं एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आक्षेपार्ह डीपफेक फोटो तयार केले
  • धमकी देऊन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याचा दबाव टाकत आरोपीने वारंवार अधिक पैसे मागितले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एका नामांकित व्यावसायिकाला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून तब्बल 90 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ​जयपूरमधील व्यावसायिकासोबत हा कांड घडला आहे. यामागची रणनिती पाहून पोलीस ही चक्रावले आहेत. आरोपी महिला दिशा बाबला हिने व्यावसायिकाच्या करोडोंच्या एआय (AI) प्रोजेक्टवर ताबा मिळवण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तिने एआय टूल्सच्या मदतीने पीडित व्यावसायिकाचे आक्षेपार्ह डीपफेक फोटो काढले होते. शिवाय अश्लील व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने वारंवार पैशांची मागणी केली.

हा व्यावसायिक त्या मुलीच्या एका स्माईलवर फिदा झाला होता. पण हेच स्माईल त्याला 90 लाखांना पडले. ​बदनामीच्या भीतीने पीडित व्यावसायिकाने सुरुवातीला 90 लाख रुपये त्या तरुणीला दिले. मात्र, आरोपी महिलेची हाव संपली नाही. त्यानंतर ती सतत पैशांची मागणी करतच राहीली. आता तिला आणखी 50 लाख रुपये हवे होते. पैसे न दिल्यास खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिली होती. शिवाय कुटुंबाला संपवण्याचं ही ती बोलली.

नक्की वाचा - Beed News: गुन्हा दाखल होण्यास 8 तास, वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास, अल्पवयीन अत्याचार पीडितेसह कुटुंबाची फरफट

या मानसिक त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने महेश नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डीसीपी राजर्षी राज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी दिशा बाबला हिला जोधपूरमधून अटक केली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड धीरज कुमार नावाचा व्यक्ती होता. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक केल्यानंतर अनेक गोष्टीचा उलगडा नक्कीच होणार आहे. त्यामुळे पोलीसांनी शोध मोहीम जलद केली आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: दुर्गाडी किल्ल्या बाहेर राडा! बकरी ईदची नमाज झाली की नाही? पोलीस बंदोबस्तात काय झालं?

एका सुंदर चेहऱ्याच्या आणि हसऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या आडून दिशा बाबला नावाच्या तरुणीने या बड्या व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढळे होते. हा व्यावसायिक तिच्या सौंदर्यावर आणि प्रोफेशनल वागण्यावर भुलला होता. मात्र, या महिलेची नजर व्यावसायिकाच्या करोडोंच्या एआय प्रोजेक्टवर होती. हे मात्र त्याला शेवटपर्यंत समजले नाही. तो तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्माईलवर फिदा झाला होता. पण ज्यावेळी या स्माईलच्या मागे एक खतरनाक कट आहे हे त्याच्या लक्षा आले त्यावेळी मात्र खूप उशिर झाला होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com