Akola Crime : पती मंगळसूत्र वाचवायला गेला मात्र पत्नीचं कुंकूच पुसलं; महिलेचा आक्रोश...

पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी गेलेल्या पतीचा अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Akola Crime : बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचा हकनाक बळी गेला. पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला मंगळसूत्र चोरट्यानं बेदम मारहाण केली. आधी डोक्याला जबर मारलं. नंतर चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमा केल्या. त्याचा चेहरा दगडाने ठेचला. जीव जाईपर्यंत चोरट्यानं महिलेच्या नवऱ्याला मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरात घडला आहे. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म चारवर रेल्वेतून एक दाम्पत्य खाली उतरत असताना एका चोरट्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महिलेच्या नवऱ्यानं मंगळसूत्र चोरट्यांचा पाठलाग केला. जवळपास आठशे ते नऊशे मीटरपर्यंत पाठलाग सुरुच होता. अखेर त्याच्या तावडीत मंगळसूत्र चोरटा आला खरा. मात्र, या चोरट्याने हातात येईल त्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत गंभीर दुखापत केली. हेमंत गावंडे असं या पाठलाग करणाऱ्या नवऱ्याचं नाव.  उपचारादरम्यान हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची वाढ केली असून तपास सुरू केला आहे. या संपूर्ण घटनेचा थरार हेमंतच्या बायकोने सांगितला आहे. मंगळसूत्र न्यायचं होतं, पण नवऱ्याला कशाला मारलं? असा सवाल तिने केला आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Crime News: विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण, 59 अश्लील व्हिडीओ अ्न शिक्षक, निनावी पत्रानं भयंकर प्रकार उघड

या घटनेनंतर अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने गांभीर्याने तपास सुरू केला आहे. आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी मिळवले. अवघ्या 24 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. परमार असं आरोपीचं नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. 

Advertisement