
परिक्षेत पास करतो या बहाण्याने एका प्राध्यापकाने आपल्याच कॉलेजमधील विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. बरं तो केवळ लैंगिक शोषण करत नव्हता तर त्यावेळी त्यांचे व्हिडीओ ही काढत होता. याच व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तो वारंवार त्यांचे लैंगिक शोषण करत होता. जेव्हा एका पिडीतेने याबाबत एनडीटीव्हीकडे पत्राद्वारे तक्रार केली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला. या पत्रा बरोबरच तिने एक पेन ड्राईव्ह ही दिला आहे. त्यात विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याचे 59 व्हिडीओ होते. पत्र लिहीणाऱ्या विद्यार्थीनीने आपले नाव मात्र गुप्त ठेवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातल्या हथरसमध्ये सेठ फूलचंद्र बागला हे कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये रजनीश कुमार हा प्राध्यापक होता. तो भूगोलाचा प्राध्यापक होता. पण विद्यार्थ्यांना शिकवण्या पेक्षा त्याचा कल भलत्याच गोष्टींकडे होता, हे आता समोर आले आहे. तो कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींना परिक्षेत पास करण्याचं अमिष दाखवायचा. शिवाय त्यांनी सरकारी नोकरीला लावतो असंही सांगायचा. असं सांगून तो त्या विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करत होता. शिवाय लैंगिक शोषण करताना त्यांचे तो व्हिडीओ ही बनवत होता.
त्या व्हिडीओच्या माध्यमातून पुढे तो त्या विद्यार्थीनींना ब्लॅकमेल करत होता. त्या माध्यमातून तो त्यांचे वारंवार लैंगिक शोषण करत होता. गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रकार या कॉलेजमध्ये सुरू होता. त्याने ज्या विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केले, त्या पैकी एक मुलगी आता पुढे आली आहे. तीने नाव न सांगता या शिक्षकाचा काळाचिठ्ठा खोलला आहे. एक निनावी पत्र लिहीत तिने या शिक्षकाची तक्रार करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. शिवाय या चिठ्ठी बरोबर तिने एक पेनड्राईव्ह ही दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Aurangzeb News: 'औरंगजेब क्रूर कसा?' कबरीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांचे काय आहे म्हणणे
या पेनड्राईनव्हमध्ये जवळपास 59 अश्लील व्हिडीओ आहेत. ज्या विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केले गेले त्यांचे हे व्हिडीओ आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधीत शिक्षका विरोधात तक्रार दाखल केले आहे. शिवाय या शिक्षकाला नोकरीवरून काढून ही टाकण्याचा निर्णय कॉलेज प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थीनींना तो परिक्षेत पास करण्याचं अमिष दाखवायचा. शिवाय कॉलेजमध्ये नोकरी लावून देतो असंही सांगायचा. या प्रकरणी पोलीसांसमोर आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. चिठ्ठी ही निनावी आहे. शिवाय जे व्हिडीओ आहेत ते 2023 सालातील आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Gold rate: दुबईपेक्षा नागपुरात सोनं स्वस्त, काय आहे कारण? जाणून घ्या हिशेब
दरम्यान हा शिक्षक लैंगिक शोषण करताना कॅमेरा लपवून व्हिडीओ तयार करायचा. त्याच व्हिडीओच्या माध्यमातून तो त्या विद्यार्थीनींना ब्लॅकमेल करायचा. शिवाय त्यांच्या बरोबर शरिर संबध प्रस्थापित करायचा. हे अनेक वर्ष सुरू होतं. आता तक्रार करण्यासाठी कुणीही पिडीत समोर आलेली नाही. त्यामुळे कुणाचीही जबाब नोंदवता आलेला नाही. त्यामुळे तपासात पोलीसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world