जाहिरात

'माझ्या पत्नीचे 3 अनैतिक संबंध' नैराश्यातून इंजिनिअरची आत्महत्या, 19 पानांच्या सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासे

Engineer Suicide: हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर सीताराम रेड्डी यांनी पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून तलावात आत्महत्या केली. 19 पानांच्या सुसाइड नोटमधील धक्कादायक खुलासे आणि पत्नीच्या अटकेची सविस्तर बातमी वाचा.

'माझ्या पत्नीचे 3 अनैतिक संबंध' नैराश्यातून इंजिनिअरची आत्महत्या, 19 पानांच्या सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासे
"Engineer Suicide: पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे इंजिनिअर तरुणाची आत्महत्या"
  • इंजिनिअर तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी पत्नी आणि तिच्या मित्राला अटक
  • 19 पानांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर
  • सुसाइड नोटमध्ये पत्नीचा एका प्रियकरासोबत खासगी क्षणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचाही दावा
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Engineer Suicide: हैदराबादमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर एस. सीताराम रेड्डी यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. या दोघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. 36 वर्षीय सीताराम रेड्डी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. त्यांनी 8 फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या हुसेन सागर तलावात उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. आत्महत्येपूर्वी सीताराम यांनी 19 पानांची सुसाइड नोट लिहिली होती, ज्यातील मजकूर वाचून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

पत्नीचे अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याचा दावा 

इंजिनिअरने सुसाइड नोटमध्ये आरोप केला आहे की, गेल्या दीड वर्षात पत्नीचे तीन वेगवेगळ्या पुरुषांसोबत अनैतिक संबंध होते. पत्नीशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आपल्या मृत्यूला पत्नीसोबत होणारे वाद जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुसाइड नोटमधील दाव्यानुसार, रेणुकाने एका व्यक्तीसोबतचे तिचे खासगी क्षण रेकॉर्ड केले होते, जे नंतर इनिस्टाग्रामवर शेअर करण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एस सीताराम यांना पत्नीच्या अफेअरबद्दल समजले. या घटनेमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या अनुपस्थितीत पत्नीचा प्रियकर घरी येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्नीने केलेल्या विश्वासघातामुळे ते पूर्णपणे खचले होते.

सर्व गरजा पूर्ण केल्या, तरीही केला विश्वासघात 

सीताराम रेड्डीने नोटमध्ये पुढे लिहिलंय की,"मी पत्नीच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली, तिला कशाचीही कमतरता भासू दिली नाही, तरीही तिने मला फसवले." पोलिसांनी या आरोपांच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून डिजिटल पुराव्यांचीही पडताळणी केली जात आहे.

(नक्की वाचा: Dombivli Suicide: डोंबिवली हादरली! पत्नी माहेरी निघून गेली, नैराश्यग्रस्त पतीची वीजेच्या बॉक्समध्ये थेट हात टाकून आत्महत्या)

पती-पत्नीमध्ये सतत व्हायचे वाद

पीडित कुटुंबानेही सूनेवर मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. तपासात समोर आलंय की, "संबंधित महिलेचे एम. रमना रेड्डी नावाच्या एका व्यावसायिकाशी संबंध होते. याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असत. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे सीताराम गंभीर मानसिक तणावात होते".

तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल

याच वर्षी जानेवारी महिन्यात एस सीताराम यांची पत्नी घर सोडून निघून गेली होती, तेव्हा त्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. एस सीताराम यांचे वडील व्यंकटेश्वर यांच्या म्हणण्यानुसार,"मुलगा सूनेच्या वागण्यामुळे खूप त्रस्त होता. सूनेचा खासगी व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याची अस्वस्थता अधिकच वाढली. याच बदनामीच्या भीतीपोटी आणि मानसिक तणावामुळे त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले".

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com