जाहिरात

Shocking news: नग्न होवून मंदिरात घुसली, मुर्ती चोरून तलावात उडी घेतली! तरुणीच्या मृत्यूचे गुढ कॅमेऱ्यात कैद

या दुर्दैवी घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह पोलिसांनी तलावाबाहेर काढला आहे. मात्र देवीची मूर्ती अजून ही सापडली नाही

Shocking news: नग्न होवून मंदिरात घुसली, मुर्ती चोरून तलावात उडी घेतली! तरुणीच्या मृत्यूचे गुढ कॅमेऱ्यात कैद
  • हैदराबादमध्ये एका २५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती
  • आत्महत्येपूर्वी या तरुणीने नग्न अवस्थेत मंदिरात जाऊन देवीची मूर्ती चोरली आणि तलावात उडी घेतली
  • प्राथमिक तपासानुसार, तरुणी मानसिक नैराश्यात होती आणि तिच्या आई-वडिलांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होते

Hyderabad Case: एका इंजिनिअर तरुणीच्या आत्महत्येने हैदराबादमध्ये खळबळ उडाली होती. वरवर ही पहिले आत्महत्या वाटत होती. पण ज्यावेळी पोलिसांनी खोलात जावून याचा तपास केला तर ते ही चक्रावून गेले आहेत. या तरुणीचा आत्महत्ये पूर्वीचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे या संपूर्ण केसला एक वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. आत्म हत्ये पूर्वी या 25 वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने नग्न अवस्थेत मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर तिने देवी अम्मावरुची मूर्ती चोरली. त्यानंतर ती घेऊन जवळच असलेल्या एका तलावात उडी मारली. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

या दुर्दैवी घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे.  तिचा मृतदेह पोलिसांनी तलावाबाहेर काढला आहे. मात्र देवीची मूर्ती अजून ही सापडली नाही. प्राथमिक तपासानुसार, ही तरुणी तीव्र मानसिक नैराश्यात होती. तिच्या घरी तिच्या आई-वडीलांची सतत भांडणं होत असल्याचं ही समोर आलं आहे. शिवाय तिची काही दिवसांपूर्वीच नोकरी ही गेली होती. ती बंगळुरूमध्ये मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर कामाला होती. मृत तरुणी बेंगळुरू येथे आयटी क्षेत्रात काम करत होती. मात्र काही काळापासून ती विशाखापट्टणम येथे राहत होती. 

नक्की वाचा - Barkha Trehan: अभिजीत दीपकेवर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण? थेट अत्याचारातील आरोपीशी आहे कनेक्शन

तिच्या आई-वडिलांमध्ये गेल्या काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होतेय. त्यामुळे तिचे वडील विशाखापट्टणम येथे तर आई हैदराबादमधील पीरजादिगुडा भागात राहत होती. आई-वडिलांमधील या वादामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती असं सांगितलं जात आहे.  तसेच तिच्या मनात एक अनामिक भीती घर करून बसली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटना घडण्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच 17 जुलै रोजी तरुणी तिच्या आईसोबत मियापूर भागात 2 BHK फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. तिथून परतल्यानंतर दोघी रात्री वेगवेगळ्या खोलीत झोपायला गेल्या. त्यानंतर तरुणीने हे भयंकर आणि टोकाचं पाऊल उचललं आहे.  

नक्की वाचा - Success story: एका रात्रीत 77 कोटी कमवाले! 'त्या' तरुणाला हे कसे जमले? थक्क करणारी कहाणी

आत्महत्या करण्या पूर्वी रात्रीच्या वेळी तरुणीने बाहेरून आईच्या खोलीला कडी लावली. त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ती नग्नावस्थेत घरातून बाहेर पडली. जवळ असलेल्या मंदिरात गेली. तिथे देवीची मुर्ती घेतली. मग तिने तलावात उडी घेतली. आधी ही आत्महत्या वाटली. पण मंदिरातील देवीची मुर्ती गायब असल्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. त्यात ही तरुणीची सर्व हालचाल कैद झाली होती. हे सीसीटीव्ही पाहील्यानंतर पोलिसांच्याही पाया खालची वाळू सरकली.  पोलीस सध्या तिच्या आर्थिक व्यवहारांची आणि कॉल डिटेल्सची चौकशी करत असून गायब असलेल्या मूर्तीचा शोध घेतला जात आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com