आताची मोठी बातमी! अटकपूर्व जामीनावरील निर्णयापूर्वीच पूजा खेडकर दुबईला पसार? 

अटक टाळण्यासाठी पूजा खेडकर दुबईला पसार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

पूजा खेडकर प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रोबेशनरी अधिकारी पूजा खेडकरांचा (Pooja Khedkar) यांचा जामीन अर्ज पातियाळा न्यायालयाकडून  फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पूजावर अटकेची टांगती तलवार असताना मोठी बातमी समोर आली आहे. अटकपूर्व जामीनावरील निर्णयापूर्वीच पूजा खेडकर दुबईला पसार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर त्यांना अटक होऊ शकते. ही अटक टाळण्यासाठी पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. 

आयएएस अधिकारी पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज फैसला घेण्यात येणार आहे. हा निर्णय पतियाळा कोर्टाकडून देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच पूजा या दुबईला पसार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूजा खेडकर यांच्या शोधासाठी पोलिसांचं पथ परदेशात रवाना होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - IAS Pooja Khedkar : कोणत्या गोष्टी पूजा खेडकरांना नडल्या? 10 मुद्द्यात समजून घेऊ!

अटकेच्या भीतीने पूजा दुबईला पसार? 
दिल्लीतील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची माहिती मिळत आहे. पूजाला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर दिल्ली पोलीस तिच्यावर कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिने आयएएस परीक्षा देण्यासाठी केवळ स्वतःचेच नव्हे, तर पालकांचे नाव बदलून यूपीएससीला माहिती सादर केली होती, असाही आरोप आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा नऊ वेळा देण्याची मुभा असताना पूजा खेडकरने 12 वेळा परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही गैरवर्तनामुळे आठ वेळा मेमो देण्यात आला होता. 2022 मध्ये आयएएसमध्ये निवड होण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील नॉन क्रीमिलेयर प्रमाणपत्राचाही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारणांवरून केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर हिच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आयोगाने तिची आयएएस तुकडीची उमेदवारी रद्द केली. पूजा खेडकर या काळात दिल्लीतच मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते.

Advertisement

आयोगाने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी तिने दिल्लीतील पटियाला हाउस या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी तसेच गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. त्यामुळे पूजाला केव्हाही अटक होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

Advertisement