हत्या करून मृतदेह मोठ्या बॅगमध्ये टाकून रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना दादर रेल्वे पोलिसांनी काही दिवसां पूर्वी पकडले होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बॅगेत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्पप्रेसने प्रवास जाण्याचा प्लॅने खून करणाऱ्यांचा होता. पण त्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात खून झालेली व्यक्ती आणि खून करणारे आरोपी हे सर्व जण दिव्यांग आहेत. त्यांची चौकशी पोलिसांनी केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.दिव्यांग असणाऱ्या या आरोपींनी धडधाकट माणसांना लाजवेल असा प्लॅन केला होता. त्यामुळेच पोलिसही आवाक झाले आहेत.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अर्शद शेख, प्रविण चावडा आणि शिवजीत कुमार सिंह हे तिघेही मित्र होते. तसेच हे दिघेही मुकबधीर आहेत. अर्शद शेख याला प्रविण चावडा याने आपल्या पायधूनीच्या घरी जेवायला बोलावले होते. त्या वेळी त्यांनी मित्र शिवजीत यालाही बोलावले होते. ते प्रविणच्या घरी एकत्र जमले. तिथे हे तिघेही दारू प्यायले. त्यानंतर अर्शद याचा डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली. हत्या करत असताना प्रविण याने बेल्जिअममध्ये राहणाऱ्या एका तरूणाला व्हिडीओ कॉलही केल्याचे समोर आले आहे. त्याला मारल्यानंतर त्याचा मृतदेह त्यांनी मोठ्या बॅगमध्ये भरला. तो टाकून देण्यासाठी ते तुतारी एक्सप्रेसने प्रवास करणार होते. पण पोलिसांनी त्यांना दादर स्थानकातच पकडले.
त्यांची चौकशी करताना काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येमध्ये केवळ हे दोघे जण सहभागी होते असे नाही. तर या हत्येचा खरा मास्टर माईड हा अर्शद शेखची पत्नी रुक्साना हिचा हात होता हे आता समोर आले आहे. रुक्साना ही पण दिव्यांग आहे. रुक्साना आणि प्रविण चावडा यांचे वर्षभरापासून विवाहबाह्य संबध होते. ही बाबही आता चौकशीत समोर आली आहे. विवाहबाह्य संबधातून ही हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर काही दिवसां पूर्वी प्रविण आणि अर्शद यांची भांडणे झाली होती. त्या भांडणांचा व्हिडीओही अर्थदने काढला होता. त्याचा राग प्रविणच्या मनात होता. त्याबाबतही चौकशी आता पोलिस करत आहे.
रुक्साना हिला दोन मुलं आहेत. तिचे प्रविण बरोबर विवाहबाह्य संबध होते. त्याच्या आड पती अर्शद येत होता. त्यातून तिच्या सांगण्यावरून ही हत्या करण्यात आली. हत्या होण्या आधी रुक्साना हिनेच काम झाले का अशी विचारणा करणारा फोन केला होता. त्याचा तपासही पोलिस करत आहेत. दरम्यान ज्या वेळी हत्या केली जात होती त्यावेळी प्रविण त्याचा व्हिडीओ काढत होता. शिवाय त्याने बेल्जिअम इथल्या एका तरूणालाही हत्ये वेळी व्हिडीओ कॉल केला होता. त्या तरूणाचा या हत्येत काही सहभाग आहे का याचा तपासही पोलिस करत आहेत. प्रविण हा पायधुनी येथे राहतो. त्याचे कुटुंबीय मात्र कॅनडात राहात असल्याची माहितीही समोर आली आहे. अनैतिक संबधां बरोबरच आणखी कोणता अँगल समोर येतो का ते ही पोलिस तपासत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world