Pune Crime : पाकिस्तान समर्थनार्थ पोस्टमुळे पुण्यातील विद्यार्थिनीला अटक, आता सिंहगड महाविद्यालयाकडूनही मोठी कारवाई

सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर कारवाई करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 1 min

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान अनेक जण सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान करीत आहेत. दरम्यान पुण्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या खदिजा शेख या  विद्यार्थिनीने वादग्रस्त पोस्ट केली आहे. या प्रकरणी तिला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणात पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील त्या तरुणीवर महाविद्यालयाकडूनही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीला महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं आहे. पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थिनीला पाकिस्तानच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे काढूव टाकण्यात आलं आहे. 

नक्की वाचा - India Pakistan News : पाकिस्तानला मिळालं IMF कडून कर्ज? तब्बल 1 अब्ज डॉलर मिळाल्याचा पाकिस्तानच्या पीएमचा दावा  

Advertisement

सिंहगड महाविद्यालयाने खदिजा शेख हिला कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर कारवाई केली. खदिजा शेख नावाच्या विद्यार्थिनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट केली होती. कोंढवा पोलिसांनी कारवाई करत खदिजा शेख हिला अटक केली असून आता महाविद्यालयाने देखील तिला काढून टाकलं आहे.