जाहिरात

सुसाइड की अपघात? शाळेत विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू, पंचनाम्यापूर्वी शाळेने रक्ताचे डागही पुसले, CCTV समोर

९ वर्षांची अमायरा शनिवारी शाळेत गेली होती. दुपारी १२ च्या दरम्यान ती बाथरुममध्ये गेली आणि तेथून चौथ्या मजल्यावर पोहोचली.

सुसाइड की अपघात? शाळेत विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू, पंचनाम्यापूर्वी शाळेने रक्ताचे डागही पुसले, CCTV समोर
  • जयपुर के एक प्राइवेट स्कूल में चौथी कक्षा की छात्रा अमायरा की चौथी मंजिल से गिरकर मौत हो गई.
  • स्कूल प्रबंधन ने जांच में सहयोग नहीं किया और शिक्षा विभाग की टीम को मिलने से मना किया.
  • पुलिस और शिक्षा मंत्री ने बताया कि घटना प्रथम दृष्टया आत्महत्या लगती है, लेकिन जांच जारी है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

जयपूरमध्ये एका खासगी शाळेत चौथीच्या वर्गातील एका विद्यार्थिनीचा रहस्यमय परिस्थितीत चौथ्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला आहे. ती कुटुंबात एकुलती एक होती. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. इतक्या मोठ्या घटनेनंतरही शाळेने मौन बाळगलं आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी शिक्षण विभागाच्या टीमने आरोप केला आहे की, शाळा व्यवस्थापनाने तपासात मदत केली नाही. 

समितीची स्थापना...

नीरजा मोदी शाळेच्या चौथ्या मजल्यावरुन कथितपणे पडल्यानंतर अमायराला जवळील रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. राज्याच्या शिक्षण विभागाकडून या प्रकरणाच्या तपासासाठी समितीचं गठण करण्यात आलं आहे. तपासानंतर नेमकं कारण लक्षात येईल. दरम्यान पुरावे जमा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलविण्यात आलं आहे. 


शाळा व्यवस्थापनाकडून मौन

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम चौकशीसाठी शाळेत गेली होती. मात्र शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक भेटले नाही. शाळेचं मुख्य दार बंद होतं आणि वारंवार आवाज दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी काहीच उत्तर दिलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. शिक्षण विभागाकडून शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत विचार सुरू आहे. अद्याप शाळेच्या व्यवस्थापनाकडून याबाबत काहीच जबाब आलेला नाही. 
 

Latest and Breaking News on NDTV

शाळेत नेमकं काय झाल?

९ वर्षांची अमायरा शनिवारी शाळेत गेली होती. दुपारी १२ च्या दरम्यान ती बाथरुममध्ये गेली आणि तेथून चौथ्या मजल्यावर पोहोचली. चौथ्या मजल्यावरुन तिने उडी मारली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी रेलिंगवर चढून खाली उडी मारताना दिसत आहे. तर आजूबाजूला इतर मुलं फिरताना दिसत आहे. विद्यार्थिनीचं वर्ग ग्राऊंड फ्लोअरवर आहे. आत्महत्येसाठी ती चौथ्या मजल्यावर गेली असावी असं दिसून येत आहे. दरम्यान शाळेचे कर्मचारी आणि शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. 

हैराण करणार बाब म्हणजे शाळा प्रशासनाने मुलगी पडलेल्या ठिकाणावरील रक्ताचे दाग पुसले. पोलिसांनी रुग्णालयाच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या मृत्यूची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकारी नीरजा शाळेत पोहोचले, मात्र घटनास्थळाची स्वच्छता करण्यात आली होती. तेथे रक्ताचे दाग नव्हते.  

हेल्पलाइन
वंद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्‍थ    9999666555 या help@vandrevalafoundation.com

TISS आयकॉल    022-25521111 (सोमवार ते शनिवार - सकाळी ८:०० ते रात्री १०:०० पर्यंत उपलब्ध)
(जर तुम्हाला मदत हवी असेल किंवा मदतीची गरज असलेल्या एखाद्या व्यक्तीला माहिती असेल तर कृपया तुमच्या जवळच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञाशी संपर्क साधा.)

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com