Jalgaon Crime : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवरुन आजीने हटकलं; नातवाने कुऱ्हाडीने केली हत्या

आजी आपल्या नातवावर जिवापाड माया करते. नातूही आजीचा लाडका असतो. मात्र जळगावमध्ये एका नातवानेच आपल्या आजीला जीव घेतल्याचं समोर आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यातील धरणगाव येथे मुलीकडे गेलेल्या लिलाबाई विसपुते या 73 वर्षीय वृद्ध महिलेवर नातवानेच कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना 29 जून रोजी घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लिलाबाई विसपुते यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 

नातू आणि आजीमधील नातं प्रेमाचं आणि मायेचं असतं. आजी आपल्या नातवावर जिवापाड माया करते. नातूही आजीचा लाडका असतो. मात्र जळगावमध्ये एका नातवानेच आपल्या आजीला जीव घेतल्याचं समोर आलं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Sangli News : दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; लैंगिक अत्याचारानंतर उचललं टोकाचं पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, लिलाबाई विसपुते काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मुलीकडे आल्या होत्या. त्यांचा नातू शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो. मात्र लोकांकडून पैसे घेऊन तो शेअर बाजारात पैसे गुंतवत असल्याने आजी लिलाबाई विसपुते यांनी त्याला हटकलं होतं. नातू तेजस पोद्दार याच्याबाबत चिंता व्यक्त करीत त्यांनी नातवाला चांगल्या सूचना केल्या होत्या. मात्र या रागातून नातवाने आजीच्या हत्येचा बनाव आखला. त्याने अज्ञात हल्लेखोराकरवी हल्ला करून पळ काढल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी नातवानेच हल्ला केल्याचे उघड करत नातू तेजस पोद्दार यास अटक केली. याप्रकरणी आता नातवाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article