जाहिरात

Sangli News : दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; लैंगिक अत्याचारानंतर उचललं टोकाचं पाऊल

गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता आणि जाता हे तरुण तिचा पाठलाग करत होते. शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते.

Sangli News : दहावीतील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या; लैंगिक अत्याचारानंतर उचललं टोकाचं पाऊल

सांगलीच्या (Sangli News) आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Crime News) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला.

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  यानंतर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने प्रकरणी संतप्त ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला बेदम मारहाण देखील करण्यात आला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान या घटनेप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहेत.

300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं

नक्की वाचा - 300 जणांची गर्दी, रात्री 1 वा. पंचायत अन् मृत्यूची घोषणा; चेटकीणीच्या संशयातून कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळलं

या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं आटपाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  त्यातील एकाला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिल्याने त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. तर दोघे पसार आहेत. या घटनेतील पीडित मुलगी एका गावात कुटुंबासोबत शेतात राहत होती. ती गावातच माध्यमिक शाळेत दहावीमध्ये शिकत होती. तिने घरात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या अगोदर रात्री मुलीने वडिलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. दुसऱ्या दिवशी ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होते. मात्र त्या अगोदरच तिने घरात गळफास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता आणि जाता हे तरुण तिचा पाठलाग करत होते. शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच घरी मोबाइलवर फोन करून त्रास दिला जात होता. त्यामुळे मुलगी अस्वस्थ होती. यातील राजू विठ्ठल गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता. ती तीने धुडकावली होती. त्यानंतर तिच्यावर अधिक दबाव वाढवला. राजू गेंडा याने जबरदस्तीने तिला एका गावातील खोलीवर नेहून अत्याचार केला होता. याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com