Jalgaon Crime: खळबळजनक! एकनाथ खडसेंच्या बंगल्यात जबरी चोरी; पोलिसांनाच आव्हान

शरद पवार गटाचे नेते नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगावातील निवासस्थानी चोरी (Theft) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon Eknath Khadse House Robbery: काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुक्ताईनगरमधील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जळगावातील निवासस्थानी चोरी (Theft) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे सध्या बंगल्यात उपस्थित नसल्यामुळे अज्ञात चोरट्यांनी ही संधी साधली. चोरट्यांनी खडसे यांचा जळगावातील बंगला बंद असल्याचे पाहून, कुलूप (Lock) तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि चोरी केली. बंगल्यातील विविध साहित्य अस्ताव्यस्त (Disarranged) करत चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे.

Satara Doctor Case: दोघांशीही संबंध, लॉजची रुमही स्वत: बुक केली, पोलिसांचे धक्कादायक खुलासे

 एका पाठोपाठ एक घडलेल्या या मोठ्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडतो आणि त्यानंतर काहीच दिवसांत विरोधी पक्षाच्या बड्या नेत्याच्या निवासस्थानी चोरी होते, हे गंभीर आहे. यामुळे जळगाव शहरातील आणि जिल्ह्यातील सुरक्षितता (Security) धोक्यात आली आहे, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

 या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास (Investigation) सुरू केला आहे. पोलिसांनी या दोन्ही घटनांचा गांभीर्याने तपास करून गुन्हेगारांना तातडीने अटक करावी आणि शहरातील वाढती गुन्हेगारी रोखावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Satara Doctor Death Case : महिला डॉक्टरच्या डायरीत काय दडलंय? अनेक मोठे खुलासे होणार