मंगेश जोशी, प्रतिनिधी
Money Mule Racket News : जळगाव सायबर पोलिसांनी ऑनलाइन फसवणुकीतील 'मनी म्यूल' रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट,पार्ट-टाईम जॉब ऑफर आणि डिजिटल अरेस्टसारख्या विविध सायबर गुन्ह्यांतून देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती.यातून मिळालेली रक्कम भुसावळ येथील एका बँक खात्यात वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
टोळीशी संगनमत केलं अन् 408 खात्यांमधून रक्कम घेतली
या प्रकरणात भुसावळ येथील मयूर सुनील कोळी याच्या खात्यावर तब्बल 1 कोटी 30 लाख 88 हजार 190 रुपये जमा झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मयूर कोळी याने सायबर गुन्हेगारांच्या टोळीशी संगनमत करून 408 खात्यांच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारल्याचा पोलिसांना संशय आहे.'मनी ट्रेल'च्या तपासातून या व्यवहारांचा माग काढण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Pune News: नाणेघाटात पर्यटकांच्या जीवाला धोका, धुक्यामुळे अक्राळविक्राळ घडलं, मित्रांनी आरडाओरडा केला, पण..
विविध राज्यांतील 23 ऑनलाइन तक्रारी
मयूर कोळीविरुद्ध महाराष्ट्रासह तामिळनाडू,उत्तर प्रदेश,तेलंगणा,दिल्ली,गुजरात आणि कर्नाटकसह विविध राज्यांतील 23 ऑनलाइन तक्रारी समोर आल्या आहेत.या प्रकरणी भुसावळ येथील इलेक्ट्रिक व्यावसायिक मयूर कोळी विरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Pune News: नाणेघाटात पर्यटकांच्या जीवाला धोका, धुक्यामुळे अक्राळविक्राळ घडलं, मित्रांनी आरडाओरडा केला, पण..
गुन्हा दाखल होताच संशयित फरार झाला आहे.त्याचा शोध घेण्यासाठी जळगाव सायबर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले असून या तपासातून आणखी मोठे सायबर रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world