Honor killing: जळगावमध्ये सैराट! 3 वर्षानंतर जावयाचा बापा समोरच मुडदा पाडला, गर्भवती मुलीवरही...

मुकेशला वाचवण्यासाठी काहीजण पुढे आले. मात्र त्यांच्यावरही या जमावाने हल्ला करत त्यांना जखमी केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

मंगेश जोशी 

प्रेमविवाहाच्या रागातून मुलीच्या घरच्यांनी जावई असलेल्या  मुकेश शिरसाठ या 26 वर्ष तरुणाची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागात घडला आहे. मुकेशच्या गर्भवती पत्नीवर म्हणजेच हल्ला करणाऱ्यांनी त्यांच्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. सैराट चित्रपटाप्रमाणेच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जळगाव शहर हादरले आहे. आपल्याच घरच्यांनी पतीचा खून केला त्यामुळे मुकेशची पत्नी धक्क्यात आहे. 3 वर्षाचं मुल तिच्या पदरात आहे. शिवाय ती आता दुसऱ्या वेळी गर्भवती आहे. याचाही तिच्या घरच्यांनी विचार न करता मुकेशचा खून केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुकेश शिरसाट हा जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या हुडको भागात राहतो. याच भागात राहाणाऱ्या पुजा बरोबर त्याचे प्रेम संबंध होते. त्यामुळे या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पुजाच्या घरच्यांचा या लग्नाला ठाम विरोध होता. मुकेशची परिस्थिती तशी बिकट होती. तो मजूरीचं काम करत होता. पण पुजाला त्याचा फरक पडणार नव्हता. तिने काही झालं तरी लग्न करायचं असं ठरवलं होतं. सर्वांचा विरोध झुगारून शेवटी त्यांनी आपल्या मना प्रमाणे लग्न केले. दोघांनीही 4 फेब्रुवारी 2022 रोजी जळगाव शहराजवळ असलेल्या उमाळा या गावात एका मंदिरात लग्न केलं. विशेष म्हणजे दोघे ही एकाच समाजाचे होते.  

ट्रेंडिंग बातमी -  त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट

लग्न केल्यानंतर मुकेश हातमजुरी  करून आपला संसार चालवत होता. दोघेही सुखात संसार करत होते. त्या काळात मुकेश आणि पुजाला एक मुलगा ही झाला. पण त्यांचा सुखी संसार पुजाच्या घरच्यांना बघवत नव्हता. मुलीने प्रेम विवाह करणं त्यांना अजूनही पटलं नव्हतं. त्यांच्या खोट्या इज्जतीला त्यामुळे तडा जात होता अशी त्यांची भावना होती. त्यामुळे वरवर जरी हे प्रकरण मिटल्या सारखे वाटत असले. सर्व काही सुरळीत चालल्या सारखे वाटत असले तरी तसं कधीच नव्हतं. पुजाच्या माहेरचे लोक वारंवार भांडण काढत होते. अनेकदा ही भांडणं  पोलिसांपर्यंत पोहोचली होती. पण हा कौटुंबिक वाद असल्याने समन्वयाने घेण्याचा सल्ला पोलिस देत होते. 

ट्रेंडिंग बातमी - पुण्यातील बहीण- भावाचा हॉटेलमध्ये मृतदेह, आत्महत्या की घातपात? चिठ्ठीतून शॉकिंग खुलासा

पण पुजाच्या घरच्यांनी हा दोघांचाही काटा काढायचा हे डोक्यात फिट केलं होतं. त्यातूनच  मुकेश बरोबर 18 जानेवारीला पुजाच्या कुटुंबियांनी वाद घातला. हा वाद मिटवण्यासाठी काहींनी प्रयत्न केला. पण पुजाच्या घरच्यांचा राग काही कमी होता होत नव्हता. रविवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडत होता. त्याच वेळी हातात लाठ्या काठ्या, धारदार शस्त्र घेऊन मुकेशच्या सासरचे म्हणजेच पुजाचे नातेवाईकांनी त्याचावर हल्ला चढवला. मुकेशच्या घरासमोरच मुकेशवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. त्यावेळी मुकेशचे वडीलही तिथे होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Political news: महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा

मुकेशला वाचवण्यासाठी काहीजण पुढे आले. मात्र त्यांच्यावरही या जमावाने हल्ला करत त्यांना जखमी केली. मुकेशवर हल्ला केल्यानंतर मुकेशची पत्नी पुजा हिच्याकडे तिच्या घरच्यांनी मोर्चा वळवला. त्यांनी तिच्यावर ही हल्ला केला. ती गर्भवती आहे याचाही त्यांनी विचार केला नाही. पुजावर हल्ला होत असताना सुदैवाने पुजाची नणंद वेळीच तिथे आली. तिने गर्भवती असलेल्या पुजाला वाचवत तिथून दुर नेलं. पण या हल्ल्यात पुजाचा पती मुकेश याचा मृत्यू झाला. पुजाला तीन वर्षाचा मुलगा आहे. तर सध्या ती गर्भवती आहे.   

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: शेवटची मॅच वानखेडेवरच का खेळायची होती? सचिननं 'राज' खोललं

या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना  जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या संपुर्ण घटनेनंतर हुडको भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध घेत मुकेशच्या पत्नीचा चुलत भाऊ, मामा यांच्यासह इतर 7 संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.  इतर 3 फरार संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्लेखोरांना फाशीची शिक्षा करण्याची मागणी मुकेशची पत्नी पुजाने केली आहे. या घटनेनं मुकेशचे कुटुंबीय हादरून गेला आहेत. तर जळगाव शहरही सुन्न झालं आहे. 

Advertisement