जाहिरात

Political news: महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा

आम्ही प्रामाणिक पणे महायुती सोबत राहीलो होतो. अशा वेळी जर आमच्या बरोबर विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असे थोरवे म्हणाले,

Political news: महायुतीत तणाव!'आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल' शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा
रायगड:

पालमंत्रिपदाची घोषणा झाल्यानंतर रायगड आणि नाशिक जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. रायगडमध्ये तर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जाळपोळ आणि रास्तारोकोही केला. रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यानंतर रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर रायगडचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेलाच मिळावे यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले आहेत. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण राष्ट्रवादीला कोणत्याही स्थितीत पालकमंत्रिपद मिळता कामा नये अशी थेट भूमीकाच त्यांनी घेतली आहे. तटकरेंनी महायुतीत राहून गद्दारी केल्याचा आरोपही या निमित्ताने करण्यात आला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शनिवारी संध्याकाळी रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे यांची वर्णी लावण्यात आली. त्यानंतर रायगड मधील शिवसैनिकांकडून त्याचा निषेध करण्यात आला. काही ठिकाणी उद्रेक ही झाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे ही दिले. जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारानी दिवसभर वरिष्ठाना याबाबत तीव्र नाराजी कळवळी. त्यानंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरे कुटुंबीयांचे नेतृत्व आम्ही कधीही स्विकारणार नाही अशी भूमीका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. महायुतीत राहून तटकरे यांनी गद्दारी केली आहे. अशा लोकांना जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नको असंही ते म्हणाले. भरत गोगावले यांनाच पालकमंत्री केले पाहीजे असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  त्या हॉटेलच्या किचनमध्ये शिजत होतं चिकन, अन् बाहेरच्या टेबलावर संतोष देशमुखांच्या हत्येचा कट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करून मोठी चुक केली होती. ती चुक सुधारण्यासाठी आम्ही उठावात सहभागी झालो होतो असं थोरवे म्हणाले. त्यानंतर रायगडचे पालकमंत्रिपद हे उदय सामंत यांच्याकडे होते. शिवसेनेकडे हे पालकमंत्रिपद असताना आता ते राष्ट्रवादीला का देण्यात आले असा प्रश्न थोरवे यांनी उपस्थित केला. मागिल सरकारमध्ये भरत गोगावले यांनी त्याग केला. मंत्रिपद दिलं नाही म्हणून अडून बसले नाही. जर ते त्यावेळी मंत्री झाले असते तर तेच पालकमंत्री झाले असते असंही थोरले म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - Exclusive : "अशी भांडणं आम्ही शाळेत लावायचो", वडेट्टीवार-राऊतांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर

महायुतीचं सरकार आल्यानंतर अपेक्षे प्रमाणे भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं. जिल्ह्यात तीन शिवसेना, तीन भाजप आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. अशा वेळी शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळणे गरजेचे आहे. जर शिवसेनेला द्यायचे नसेल तर ते पद भाजपला दिले तरी चालेल पण राष्ट्रवादी नको अशी भूमीका थोरवे यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. त्यात गोगावले यांना पालकमंत्री करा अशी मागणी केली होती असं ही ते यावेळी म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - पुण्यातील बहीण- भावाचा हॉटेलमध्ये मृतदेह, आत्महत्या की घातपात? चिठ्ठीतून शॉकिंग खुलासा

आम्ही प्रामाणिक पणे महायुती सोबत राहीलो होतो. अशा वेळी जर आमच्या बरोबर विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल. आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे आम्ही जाहीरपणे वरिष्ठाना आणि भरत गोगावले यांना कळविले होते असं हे ते म्हणाले. शिवाय  आता जो स्थगितीचा निर्णय झालेला आहे त्याचे आम्हा स्वागत करतो असं ही ते म्हणाले. विधानसभेमध्ये महायुती असताना सुद्धा शिवसेनेच्या  तिन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करत त्यांनी तटकरेंकडे बोट दाखवले आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com