लक्ष्मण सोळुंके
जालन्यातील बदनापूर हे गेल्या 10 वर्षात शैक्षणिक हब बनवू पाहत आहे. बदनापूरमध्ये 2 मेडिकल कॉलेज, 10 पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या 25 हुन अधिक शाळा आहेत. 7 किलोमीटरच्या परिसरातच या सगळ्या शाळा आणि महाविद्यालये आहेत. याच 7 किलोमीटरच्या अंतरातच 25 बिअरबार आणि दारूची दुकानं थाटली गेली आहेत.त्यामुळे या भागात आता वेश्याव्यवसाय तेजीत सुरू झाल्यानं नागरीकांनी संताप व्यक्त केलाय. याचं NDTV मराठीनं स्टिंग ऑपरेशन केलं. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदनापूर शहराला सध्या शरीर विक्रीचा धंदा तेजीत सुरू आहे. इथं खुलेआम शरीरविक्री होत आहे. इथं शरीर विक्रीचे दर ठरवले जातात. यासाठी एक महिला आघाडीवर असते. इथलं चित्र पाहिल्यानंतर कुठल्या शहरात नाही तर कुठल्या तरी रेडलाईट एरियात आपण आहोत की काय असा प्रश्न पडतो. जालना जिल्ह्यातील एज्युकेशन हब बनू पाहणाऱ्या बदनापूरमध्ये बिअरबार आणि परमिट रूमच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तेजीत आहेत. त्यामुळे बदनापूर शहरातील नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
या भागात शाळा,महाविद्यालयात हजारो मुलं आणि मुली शिक्षण घेत आहेत. अशा स्थितीत या भागात दिवस आणि रात्री हा व्यवसाय सुरु झाल्यानं शाळेत आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींचे पालक संताप व्यक्त करत आहेत.मात्र या बिअरबार आणि परमिट रूमवर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे या भागात सुरू असलेल्या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचं पाठबळ आहे का असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. राजरोसपण हे धंदे सुरू असल्याने आश्चर्यही व्यक्त होत आहे.
हा शरीर विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुली आणल्या गेल्या आहेत. तर काही मुली या थेट बांगलादेशातून आणल्या आहेत. विशेष म्हणजे या भागात सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड होऊ नये म्हणून बांग्लादेशी आणि उत्तर प्रदेशातील मुलींचा व्यवसायासाठी वापर केला जातोय. त्यामुळे या परप्रांतिय महिलांनाही इथं कुणी आणलं असा प्रश्नही निर्माण होत आहे. त्यात बांगलादेशी मुलींची संख्याही मोठी आहे. ही सर्वात धक्कादायक समजले जात आहे.
अशा स्थितीत या अवैध व्यवसायाला पायबंद कधी घातला जाणार असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होवू शकतो. विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागू शकतात. या गोष्टी लक्षात घेता या धंद्याचं समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावलं उचलावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे NDTV मराठीने केलेल्या या भांडाफोडने प्रशासनाला आता तरी जाग येईल का हे पहावे लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world