Jalna Crime: चौघांनी मिळून काटा काढला, भररस्त्यात तरुणाला संपवलं; जालन्यात खळबळ

याप्रकरणी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

जालना: जुन्या वादातून एकावर चाकूने वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

नक्की वाचा - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यातील अंबड शहरात जुन्या वादातून तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडलीय. यात एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड शहरातील पठाण मोहल्ला भागात राहणाऱ्या कलिम शेख खाजा शेख अस खून झालेल्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

(नक्की वाचा- Navi Mumbai : लोन रिकव्हरी एजंन्ट्सचा जाच; शिक्षकाने अटल सेतूवरून उडी घेत संपवलं जीवन)

रात्री कलीम हा पठाण मोहल्ला भागात फिरत असताना चार जणांनी त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. चाकूने वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत रात्री उशिरा जालना जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृत्यदेह पाठवत एका संशयित आरोपीला ताब्यात घेत आणखी तीन आरोपीचा शोध सुरू करत चार जणांविरुद्ध धारदार चाकूने वार करून खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय. या घटनेने अंबड शहरात एकच खळबळ उडाली आहे.