Jalna News : तो 24 अन् ती 38 वर्षांची; प्रेमाचा भयंकर शेवट पाहून गावही हादरलं!

प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. प्रेमाला वयाचंही बंधन नसतं. जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंखे, प्रतिनिधी

Jalna News : प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. प्रेमाला वयाचंही बंधन नसतं. जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील तो २४ वर्षांचा तर ती ३८ वर्षांची. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं असं सांगितलं जात आहे. दोघांमध्ये तब्बल १४ वर्षांचं अंतर होतं. त्याचं प्रेम फार काळ टिकू शकलं नाही. आणि दोघांनी अत्यंत धक्कादायक पद्धतीने या जगाचा निरोप घेतला. 

काय आहे नेमकं प्रकरण?  

भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघं जण चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार, पोलिसांकडून तपास सुरू होता. आज वाढोना गावाजवळ असलेले कालिंका माता डोंगर पर्वतरांगांमध्ये एका झाडाला एका महिलेसह तरुणांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच पंचनामा करून चौकशी केली असता गणेश उत्तम वाघ हा  24 वर्षीय तरुण आणि जयाबाई पांडुरंग गवळी वय 38 वर्ष अस गळफास लावून आत्महत्या केलेल्या दोघांची नाव असल्याची माहिती समोर आली आहे. 

नक्की वाचा - Lesbian Mother Crime:आईचे समलैंगिक संबंध, प्रेमासाठी 5 महिन्याच्या बाळाची हत्या; 'त्या' Video मुळे बिंग फुटलं

या दोघांचे मृतदेह एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता दोघे ही गेल्या चार दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती ही समोर आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पारध पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. दरम्यान प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Topics mentioned in this article