lesbian mother killed her 5-month-old baby : तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील केलामंगलममधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका महिलेने आपल्या लेस्बियन पार्टनरसोबत मिळून आपल्या पाच महिन्याच्या मुलाची हत्या केली. तर दुसरीकडे आपला गुन्हा लपविण्यासाठी महिलेने कुटुंबीयांना मुल आजारी असल्याचं खोटं कारण सांगितलं. घरातील सदस्यांनी महिलेचं म्हणणं ऐकलं. मात्र महिलेच्या पतीचा संशय बळवला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली.
बाळाचा गळा आवळला...
ही घटना २ नोव्हेंबरची आहे. महिलेने कथितपणे आपल्या मुलाचा गळा आवळला आणि त्याला दफन केलं. मात्र महिलेच्या पतीचा तिच्यावर संशय होता. त्यामुळे तो केलमंगलम पोलिसांकडे पोहोचला आणि तपासाची मागणी केली. या दरम्यान पोलिसांना महिलेच्या फोनमध्ये मृत बाळाचा एक फोटो सापडला. जो तिने आपल्या लेस्बियन पार्टनरला पाठवला होता. दरम्यान महिलेच्या मोबाइलमध्ये मेसेज, फोटो आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. पत्नीने आपल्या समलैंगिक पार्टनरला दबावाखाली पाच महिन्याच्या बाळाची हत्या केली, असा आरोप पतीने केला आहे.
नक्की वाचा - Haryana News : पतीच्या मृतदेहाशेजारी बसून पत्नीचा मेकअप; नात्याचं भयाण रुप पाहून शेजारीही हादरले!

नको होतं बाळ...
तपासादरम्यान लहान बाळाचा पुरलेला मृतदेह उकरून काढण्यात आला. बाळाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा गळा दाबल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपी महिलेची चौकशी केली तर तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती तिची काळजी घेत नव्हता. तिला तिचं मुल नको होतं. त्यामुळे तिने बाळाची हत्या केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world