जाहिरात

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज पुन्हा बरळले, प्रकरण चिघळणार, छावा चित्रपटाचाही उल्लेख

वादग्रस्त वक्तव्य करण्याची आपली सवय सोडण्यास कालीचरण महाराज काही तयार दिसत नाहीत. असंच त्यांनी केलेल्या नव्या वादग्रस्त वक्तव्यावरून तरी दिसत आहे.

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज पुन्हा बरळले, प्रकरण चिघळणार, छावा चित्रपटाचाही उल्लेख
सांगली:

कालीचरण महाराज हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या या वक्तव्याने अनेक वेळा वातावरण चांगलचं तापलं आहे. महात्मा गांधी बाबात ही त्यांनी उलटसुलट वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांच्या ही अडचणी वाढल्या होत्या. मात्र तरही वादग्रस्त वक्तव्य करण्याची आपली सवय सोडण्यास कालीचरण महाराज काही तयार दिसत नाहीत. असंच त्यांनी केलेल्या नव्या वादग्रस्त वक्तव्यावरून तरी दिसत आहे. त्यांच्या या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांनी नवा वाद निर्माण केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सध्या छावा ही चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफीसवर सध्या या चित्रपटाची धूम दिसत आहे. अशा वेळी कालीचरण महाराजांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की जसे वेश्यांचे सिनेमे येतात, त्या सिनेमांना आपण भरपूर पैसे मिळवून देतो, तसे छावा सारख्या ऐतिहासिक सिनेमाला पैसा द्यायला काय हरकत आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याच्या प्रतिक्रीया आता उमटत आहेत.   

ट्रेंडिंग बातमी - Ganoji Shirke: छत्रपती संभाजी राजेंबरोबर गणोजी शिर्केंनी खरोखर गद्दारी केली होती का? पुरावे काय सांगतात?

छावा सिनेमाबद्दल बोलताना ते म्हणाले हा सिनेमा पाहाण्यासाठी अवश्य सहकुटुंब जावं. असे सिनेमा बनवणाऱ्यांना भरपूर पैसा द्यावा असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले आहे. जर आपण तसे केले तर हेच निर्माते उद्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा आपल्या खऱ्या इतिहासावर सिनेमे बनवतील. ज्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान जागृत होईल. त्यामुळे  असे सिनेमे बनवणाऱ्यांना भरपूर प्रोत्साहन द्या. भरपूर आर्थिक मदत करा असं सांगायला कालीचरण महाराज विसरले नाहीत. 

ट्रेंडिंग बातमी - Dombivli : 65 इमारतींमधील नागरिकांची पुन्हा फसवणूक, बिल्डरांनी गोळा केले तब्बल दीड कोटी

वेश्यांचे सिनेमे असा उल्लेख करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.  2021 मध्ये झालेल्या धर्मसंसदेतही कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल महात्मा  गांधींविषयी अपशब्द उच्चारले होते. यावेळी नथुराम गोडसेचे कौतुक त्याने केलं होतं. धर्मसंसदेतच अनेकांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. महंत राम सुंदरदास यांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता.