
वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले कालीचरण महाराजांनी (Kalicharan Maharaj) पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी मुस्लीम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात मुस्लीम समाज आक्रमक आहे. रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत हिंदु संघटनांकडूनही मोर्चा काढला जात आहे. श्रीरामपुरमध्येही रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. (Kalicharan Maharaj controversial statement)
यावेळी कालीचरण महाराज यांनी गांधीजींनी दिलेला अहिंसा परमोधर्म हा मंत्र अत्यंत भंपक असल्याच सांगत तो 500 टक्के चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वीही त्यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आज पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधीवर जोरदार निशाना साधला आहे. चांगल्याला छेडायचं नाही आणि वाईटाला सोडायचं नाही हाच खरा मंत्र असल्याच कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा - 4 वर्षांच्या चिमुरड्याने उलटी केली म्हणून प्रियकराने बाळाला संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना
ते पुढे म्हणाले, भगवान श्रीरामाने हिंसा केली, कृष्णचंद्र महाराज भगवानने महाभारत युद्धात 166 कोटी दुष्टांना मारून टाकलं. हिंसेशिवाय भूलोकावरील भार हलका होणं शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज, कृष्णचंद्र, रामचंद्र प्रभू, गुरू गोविंद सिंह महाराज, राणा प्रताप यांच्या पावलावर मस्तक ठेवून आपण चाललं पाहिजे. तरच राष्ट्राचा आणि धर्माचं संरक्षण होईल.
2021 मध्ये झालेल्या धर्मसंसदेतही कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. भारत-पाकिस्तान फाळणीबद्दल महात्ना गांधींविषयी अपशब्द उच्चारले होते. यावेळी नथुराम गोडसेचे कौतुक केलं होतं. धर्मसंसदेतच अनेकांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. महंत राम सुंदरदास यांनी कालीचरण यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world