Kalyan building collapses : स्लॅबच्या दुरुस्तीमुळे घात झाला? चौथ्या मजल्यावरील घरमालकाला अटक

कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील सप्तशृंगी इमारतीच्या स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्यू पावले, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अहजद खान, प्रतिनिधी

कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील सप्तशृंगी इमारतीच्या स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्यू पावले, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दुर्घटनाग्रस्त इमारतीत दुरुस्तीचे काम करणाऱ्या घर मालकास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या घर मालकाचे नाव कृष्णा लालचंद चौरसिया असं आहे. त्याच्या विराोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

दुर्घटना ग्रस्त इमारतीच्या चौथ्या मजल्यावर चौरसिया राहतो. त्याच्या घरातील स्लॅबच्या दुरुस्तीचं काम सुरू होते. स्लॅब कच्चा असल्याने कोसळून चौथ्या मजल्यापासून थेट तळमजल्यापर्यंत आला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाले. या प्रकरणी दुरुस्तीचे काम करणारा घर मालक चौरसिया याला अटक केली आहे. या घटनेस अन्य कोणी जबाबदार असतील. त्यांचे नावे निष्पन्न झाल्यावर त्यांच्या विरोधातही कारवाई केली जाणार आहे.

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील पद्मावती नगर सोसायटीला पुणे मनपाची नोटीस, जागेचा वेगळाच वाद, काय आहे प्रकरण?

या गुन्ह्यात पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे. त्याठिकाणचे काही सॅम्पलही गोळा करुन तपासाकरिता फॉरेन्सिक लॅबला पाठविणार आहोत. 
या दुर्घटनेत जखमी झालेल्या एकाला एका खाजगी रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करुन घेण्यास नकार दिला. या विषयी काही कारवाई केली जाणार आहे का? अशी विचारणा एसीपी घेटे यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, अशी माहिती आमच्याकडे आलेली नाही. तसा काही प्रकार असल्यास त्याची चौकशी केली जाईल.

Advertisement