जाहिरात

Pune News : पुण्यातील पद्मावती नगर सोसायटीला पुणे मनपाची नोटीस, जागेचा वेगळाच वाद, काय आहे प्रकरण?

पद्मावती नगर सोसायटीच्या इमारतीतील रहिवासींना इमारत रिकामी करण्यासाठी महापालिकेने नोटीस पाठवली आहे.

Pune News : पुण्यातील पद्मावती नगर सोसायटीला पुणे मनपाची नोटीस, जागेचा वेगळाच वाद, काय आहे प्रकरण?

रेवती हिंगवे, पुणे

कल्याणमधील इमारत कोसळल्याचं प्रकरण ताजं असताना प्रशासन अलर्टवर आहे. पुण्यातील पद्मावती नगर सोसाइटीमध्ये काल अचानक मुसळधार पावसानंतर कंपाऊंडची भिंत कोसळली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने त्या सदनिकेला नोटीस पाठवून तातडीने इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इमारत रिकामी करण्यासाठी  प्रत्येक सदस्याच्या नावाची नोटीस बजावण्यात आली आहे. तर ही कंपाऊंडची भिंत कशी कोसळली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

पद्मावती नगर सदानिकेच्या कंपाऊंडची भिंत पडली आणि त्यानंतर जो रस्ता त्या सदनिकेच्या बाहेरून जातो, तिथल्या वस्तीतल्या एका घरात त्याचा सगळा राडा रोडा पडला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. पण गेल्या अनेक वर्षांत वस्तीतल्या लोकांनी कंपाऊंडच्या भिंतीबद्दल पुणे मनपाला आणि सोसायटीमधील रहिवाशांना ही सांगितलं होतं, असा दावा केला जात आहे. ही जागा त्यांना 1956 मध्ये मिळाली. ती जागा अधिकृतपणे त्यांची आहे. म्हणून आता या घटनेमुळे फक्त ढकलढकल गेल्याचा दावा केला जात आहे. 

Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

नक्की वाचा - Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

एकीकडे वस्तीतील लोक म्हणतात,  ही जागा आमच्या पणजोबांना 1956 ला मिळाली. एकीकडे पद्मावती नगर सदनिकेतील लोक म्हणतात की सोसायटीच्या एफएसआयमध्ये वस्तीतील जागा पण आहे. पण त्यावर कारवाई होत नाही. सोसाइटीमधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काल सी इमारतीच्या एका पिलरची स्ट्रेंथ कपॅसिटी चाचणी झाली, पण त्याचा अहवाल यायच्या आधीच त्यांना नोटीस ठोठावण्यात आली.

पुण्यातील पद्मावती नगर सोसायटीला पुणे महानगरपालिकेची नोटीस

पद्मावती नगर सोसायटीच्या सी इमारतीतील रहिवासींना इमारत खाली करण्यासाठी महापालिकेची नोटीस

Listen to the latest songs, only on JioSaavn.com