Kalyan Crime: वृद्धाला गाठलं, रेल्वे ट्रॅकवर नेऊन बेदम मारलं अन्... कल्याणमधील धक्कादायक घटना

दोघांनी त्यांच्या जवळील महागडी सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून घेतला. अनंत यांनी यावेळी प्रतिकार केला. दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

 अमजद खान, कल्याण: रेल्वे ट्रॅकवर घेऊन जाऊन  एका 70 वर्षीय वयोवृद्धाला बेदम मारहाण करुन त्याला लुटण्याची घटना खडवली रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. या प्रकरणात कल्याण जीआरपी पोलिसांनी दोन लूटारुंना बेड्या ठोकल्या आहे. शंकर शिरसाट आणि नरेंद्रसिंग गौतम अशी या चोरट्यांची नावे आहेत. शंकर हा कचरा उचलणाऱ्या घंटा गाडीवर काम करताे. तर नरेंद्रसिंग हा एका मिठाईच्या दुकानात काम करतो. या दोघांनी आणखी किती लोकांसाेबत असा प्रकार केला आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काही दिवसापूर्वी खडवली परिसरात राहणारे अनंत नांदलकर काही कामानिमित्ताने बाहेर गेले होते. संध्याकाळी ते पुन्हा खडवली स्टेशनला आले. खडवली रेल्वे स्टेशनला उतरताच त्यांना दोन तरुण भेटले. त्या दोघांनी अनंत यांना बोलण्यात गुंतवून रेल्वे स्टेशनपासून 200 मीटर अंतरावर घेऊन गेले. दोघांनी त्यांच्या जवळील महागडी सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावून घेतला. अनंत यांनी यावेळी प्रतिकार केला. दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली.

अनंत या मारहाणीत  गंभीर जखमी झाले. त्यांना रेल्वे ट्रॅकच्या बाजूला बेशूद्ध अवस्थेत सोडून त्यांच्या खिशातील पर्स काढून दोघे पसार झाले. काही नागरिकांनी अनंत यांना रुग्णालयात दाखल केले. कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल झाली. पोलीस अधिकारी पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके या प्रकरणाचा तपास करीत होते. या तपासात खडवली स्टेशनला असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्या तरुणांची ओळख पटली. या दोघांच्या विरोधात या पूर्वीही गुन्हे दाखल आहेत.  पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला.

नक्की वाचा - Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल

अखेर कल्याणनजीक विठ्ठलवाडी परिसरातून शंकर आणि नरेंद्रसिंग या दोघांना अटक करण्यात आली. दोघांकडून पाेलिसांनी अनंत नादलकर यांच्याकडून चोरलेल्या वस्तू देखील हस्तगत केल्या आहेत. या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारे अन्य किती लोकांना लूटले आहे याचा तपास पोलिस करीत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article