अमजद खान
दोन व्यावसायिक मित्रांनी एक महागडी कार लोनवर घेतली होती. काही दिवस कारचे हाफ्ते दोघे ही देत होते. शिवाय ही कार दोघेही वापरत होते. पण काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला. या दोघांची पार्टनरशीप तुटली. दोघांपैकी एक कृष्णा चौधरी हा लोनचे पैसे भरत होता. मात्र रोहित राठोड ही कार वापरत होता. त्यावर कृष्णाचा आक्षेप होता. तिथेच खटका उडाला. यावादातूनच लहान पणापासूनची असलेली मैत्री एका कारमुळे दुष्मनीत बदलली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कारचे लोन मी भरतो. तर कार तू कशी वापरतो? अशी विचारणा कृष्णा याने रोहितला केली. यातून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातूनच रोहित राठोड याने कृष्णा चौधरीवर थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या कृष्णा चौधरीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या अडीवली परिसरात ही घटना घडली. यानंतर पोलीसांनी या प्रकणाचा तपास सुरू केला आहे.
आडीवली परिसरात रोहीत राठोड आणि कृष्णा चौधरी हे दोघे राहतात. ते लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघेही फायनान्सचा व्यवसाय करतात. त्यांनी काही महिन्यापूर्वी पार्टनरशीपमध्ये क्रेटा या कंपनीची कार घेतली होती. त्यासाठी त्यांनी डाऊनपेमेंट केले होते. शिवाय कार खरेदी करण्यासाठी त्यांनी लोन ही घेतले होते. कार कृष्णा चौधरीच्या नावे होते. कारच्या लोनचे हप्ते कृष्णा भरत होता.तर रोहित कृष्णाला इंस्टॉलमेंटचे अर्धे पैसे देत होता.
त्यातून हे दोघे ही कार वापरत होते. काही दिवसानंतर दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला . कृष्णा कारचे पैसे भरत होता. मात्र रोहित त्याला पैसे द्यायचे बंद झाला. असं असताना तो कार मात्र वापरत होता. या गोष्टीवरुन कृष्णा याने रोहितला वारंवार हटकले होते. कारच्या लोनचा हप्ता मी भरतो. तर कार तू कशी चालविणार? यावरुन दोघांमध्ये बुधावारी रात्री वाद झाला. या वादातून रोहित राठोड याने कष्णा चौधरीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कृष्णा चौधरी जखमी झाला आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्लानंतर रोहित राठोड हा फरार झाला आहे. पोलिस रोहित राठोडचा शोध घेत आहेत.