Kalyan News: रेल्वे स्थानकावरून 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण, रेल्वे यार्डात लैंगिक अत्याचार, CCTV मुळे...

अवघ्या 14 वर्षांची ही पीडित मुलगी आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

एका 14 वर्षाच्या मुली सोबत कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सौरभ सोनवणे याला बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे स्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पीडित 14 वर्षांची मुलगी आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याण येथे आली होती.अहिल्यानगरहून निघाल्यानंतर ती कल्याण बस स्थानकात उतरली. त्यानंतर तीला खोपोलीला आपल्या मामाकडे जायचं होतं. त्यामुळे ती कल्याण रेल्वे स्थानकात गेली. तिथे ती लोकलची वाट पाहात होती. हीच संधी साधत ओळख नसलेला आरोपी सौरभ सोनवणे तिथे आला. त्याने कोणतीही ओळख नसताना पीडित मुलीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. 

Advertisement

नक्की वाचा - CNG Prices Hike: महागाईचा भडका! दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरांत CNG महागला, पाहा नवे दर

मुलीने जेव्हा आपला मोबाईल परत मागितला, तेव्हा 'मोबाईल पाहिजे असेल तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल' अशी बतावणी त्याने केली. परगावातून आल्याने ती ही घाबरली. पोलीस स्टेशनला जावं लागेल हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळे ती त्याच्या सोबत जायला निघाली. मात्र आरोपी सौरभने तिला पोलीस स्टेशनला नेण्या ऐवजी फसवणूक करून कल्याण रेल्वे यार्डात नेले. त्यानंतर तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तो तिला तिथेच सोडून निघून गेला.

Pandharpur News: विठुरायाच्या मंदिरात दर्शनाचा काळाबाजार! ऑडियो क्लीपने खळबळ; थेट UPIद्वारे वसुली

या भयानक प्रसंगातून सुटका करून घेत पीडित मुलगी कसाबसा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपी सौरभ सोनवणे याला शोधून काढून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र कल्याण सारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकात असा प्रकार घडल्याने सर्वच जण हादरले आहे. शिवाय पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ही निर्माण झाला आहे.