Vishal Gawli Suicide : कल्याणमधील 13 वर्षांच्या चिमुरडीचं लैंगिक शोषण करून हत्या करणारा विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात बाथरूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. पहाटे साडे तीनच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्यां सांगितलं जात आहे. मात्र या प्रकरणात विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी आक्षेप नोंदवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशाल गवळी याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय संजय धनके यांच्याकडून करण्यात आला आहे. अक्षय शिंदेची जशी हत्या करण्यात आली तशीच विशाल गवळीची होऊ शकते अस मला संशय होता. त्यामुळे मी न्यायालयात विशालच्या सुरक्षेत वाढ करण्यासंदर्भात अर्जही केला होता. दरम्यान आज पहाटे त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र माझ्या मते पोलीस यंत्रणेने त्याची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. घटनास्थळी गेल्यानंतर या प्रकरणाचा नेमका खुलासा होईल असंही वकिलांनी यावेळी सांगितलं.
नक्की वाचा - Kalyan Crime : क्रूरकर्माचा शेवट, विशाल गवळीची आत्महत्या; वाचा कल्याण गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम
कल्याण गुन्हे प्रकरण...
बदलापूर शाळेत चिमुरडीवर (13 वर्षे) लैंगिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असताना कल्याणमध्ये घडलेल्या मुलींवरील लैंगिक अत्याचार आणि निघृण हत्येनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळही होती. 23 डिसेंबर रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणारी चिमुकली हातात 20 रुपये घेऊन खाऊ आणायला निघाली ते घरी कधीच परतली नाही. दुसऱ्या दिवशी 24 डिसेंबरला तिचा मृतदेह बोपगाव परिसरात सापडला होता. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. विशाल गवळी या नराधमाने तिच्या शरीराचे लचके तोडले आणि त्यानंतर तिची निघृणपणे हत्या करीत तिला फेकून दिलं. चिमुरडी विशाल गवळीला काका म्हणत असे. एकाच भागात राहत असल्याने ती त्यांना ओळखत होती. मात्र या कशाचाही विचार न करता विशाल गवळीने त्या चिमुरडीच्या शरीराचे लचके तोडले. धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळीच्या पत्नीने त्याला या गुन्ह्यात मदत केली. आज याच नराधमाने तुरुंगात गळफास घेत आत्महत्या केली.